लिफ्ट अचानक दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळली. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असून अंगावर काटा आणणारी घटना आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लिफ्ट खाली कोसळण्याची काही सेकंदापूर्वी दोन मुलं या लिफ्टमध्ये होती. ही घटना पुण्यातून समोर आली आहे.
Shocking News : पाणी पिणं महिलेसाठी ठरलं जीवघेणं, घडलं असं की झाली भयानक अवस्था
advertisement
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दोन मुलं लिफ्टमध्ये आहेत. ते एकमेकांशी बोलत आहेत. त्यानंतर लिफ्ट थांबते आणि मुलं त्यांच्या मजल्यावर उतरतात. लिफ्ट बंद होते अचानक लिफ्टमध्ये हलचाल पहायला मिळते. लिफ्ट दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळते. लिफ्ट ओढण्याची वायर तुटल्यानं हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अपघाताच्या वेळी लिफ्ट पूर्णपणे रिकामी असल्याने सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लिफ्टमध्येच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे भीषण दृश्य कैद झाले असून, ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवघ्या 47 सेकंदांचा हा व्हिडिओ श्वास रोखणारा आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. हरिश देशमुख नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
दरम्यान, लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड, लिफ्ट कोसळणे, लिफ्टमध्ये काहीतरी घडणं, अशा अनेक घटना वारंवार समोर येत असतात. त्यामुळे यापूर्वीही अशा बऱ्याच घटना घडल्या असून चर्चेत आल्या आहेत.
