पुण्यात आता वाचकांना मोफत पुस्तकं वाचवण्याचं एक प्रसन्न ठिकाण सुरू झालंय. 'भावर्थ पुस्तकालय' असं या दुकानाचं नाव आहे. कर्वे पुतळ्याजवळ असलेल्या या दुकानाला पुणेकरांनी वर्षभरातच डोक्यावर घेतलंय. सुमधूर संगीत, सुसज्ज बैठकव्यवस्था आणि इथले खास वैशिष्ट्य म्हणजे इथला प्रसन्न अँबियन्स यामुळे वाचनाची अविस्मरणीय अनुभूती घेण्यासाठी इथे सदैव वाचकांची रेलचेल असते.
advertisement
मराठी लोकांना एकत्र जोडण्याचा भावार्थ हा एक उपक्रम आहे. या ठिकाणी या आणि सर्व प्रकराची मराठी मराठी पुस्तकं वाचा. सध्या जवळपास 6 हजार पुस्तकं इथं आहेत. यामध्ये चरित्र, अध्यात्म,विज्ञान, इतिहास, आरोग्य, नाटक आणि कवितांचा समावेश आहे. त्याचबरोबर इथं बालसाहित्य देखील वाचता येतं. सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथं कुणालाही अगदी मोफत ही पुस्तकं वाचता येतात, अशी माहित 'भावार्थ' च्या व्यवस्थापक कीर्ती जोशी यांनी दिली.
'पुस्तकांच्या दुकानात क्रॉसवर्डला ग्लॅमर आहे. मराठी पुस्तकांनाही तसंच ग्लॅमर देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. ज्यांना वाचनाची आवड आहे ते ग्रंथालयात जातात. पण, ज्यांना पुस्तकांची आवड निर्माण व्हायची आहे त्यांना मराठी वाचनकडे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एकटेपणाला Live-in चा पर्याय; 72 वर्षांच्या आजी-आजोबांनी 9 वर्षांपासून लग्नाशिवाय थाटला संसार
'पाश्चिमात्य देशात जशी बुक कॅफे असतात तसाच मराठी पुस्तकांसाठी बुक कॅफेचा प्रयोग आम्ही सुरू केलाय. इथं भारतीय बैठकीचीही सोय आहे. त्याचबरोबर कॉफी मशिनही असून तिथं एक कॉईन टाकला की तुम्हाला कॉफीच्या आनंदासह पुस्तकं वाचता येतात, असं जोशी यांनी सांगितलं.