वाहतूक आणि पार्किंगचे नियोजन
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरातील १७ मुख्य रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, १० मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी 'नो पार्किंग झोन' जाहीर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, विसर्जन मिरवणुकीच्या दोन दिवसांदरम्यान शहरात जड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी असेल.
advertisement
या सर्व बदलांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत राहील आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पुणे वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज (FC) रोड, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रोड, प्रभात रोड, हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.