कुख्यात गुंड ते हिंदुत्ववाद्यांचे व्यासपीठ
शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या संदिप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ आहे. 2007 ला संदिप मोहळचा गणेश मारणे टोळीने खून केला. गणेश मारणे सोबत सचिन पोटेही आरोपी आहे. संदीपची गाडी चालवत असलेल्या शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली. (गजा मारणे टोळीचा काही संबंध नाही. ही आंदगावची मारणे टोळी). 2010 ला शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा निलायम टॅाकीजजवळ खून केला.
advertisement
लवळेगावच्या सरपंचाचं किडनॅपिंग आणि रॅाबरीमध्ये देखील शरद मोहोळ प्रमुख आरोपी आहे. तेव्हापासून शरद येरवडा जेलमध्ये होता. 2012 मध्ये जेलमध्ये जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी महंमद कातील सिद्दीकीचा बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तो छोटा राजनप्रमाणे हिंदुत्ववादी डॅान असल्याचं सांगत होता. यानंतर तो हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपीठावर कार्यक्रमांना दिसत होता. दीड वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आला. राजकीय वाटचालीसाठी भाजपची निवड केली. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पत्नी स्वाती मोहोळने भाजप प्रवेश केला. त्यांची महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. पत्नीला नगरसेवक करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होती. राजकीय महत्वकांक्षेनंतर गुन्हेगारी कारवाया थंडावल्या होत्या. मात्र, आज लग्नाच्या वाढदिवशीच खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
वाचा - कुख्यात गुंड शरद मोहोळचा गेम ओव्हर, लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू
वर्षभरापूर्वीच दोन गँगमध्ये टोळीयुद्ध
पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात फेब्रुवारी 2022 मध्ये व्यावसाईक वर्चस्ववादातून टोळी युद्धाचा भडका उडाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील सदस्यांनी विठ्ठल शेलारवर हल्ला केला होता. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.