कुख्यात गुंड शरद मोहोळचा गेम ओव्हर, लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू

Last Updated:

कुख्यात गुंड शरद मोहोळ राहत असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.

कुख्यात गुंड शरद मोहोळ
कुख्यात गुंड शरद मोहोळ
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : देशात राहण्यासाठी सर्वात योग्य समजलं जाणारं पुणे शहर सध्या सततच्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आलं आहे. कोयता गँगचा घुडगूस शहरात सुरुच आहे. अशातच आज कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड इथं गोळीबार केला. यात मोहोळला चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने वनाज सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मोहोळ याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे चारशे ते पाचशे जणांचा जमाव जमला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ याच्यावर आज पुण्यात कोथरूड इथं जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अज्ञात हल्लेखोरांनी मोहोळेवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात मोहोळला चार गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने वनाज सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथं उपाचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
advertisement
काही महिन्यापूर्वीच शरद मोहोळ याची पत्नी हिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शरद मोहोळ ही अनेक हिंदुत्ववादी संघटनाच्या व्यासपिठावर उघडपणे वावरत होता. आज त्याच्या लग्नाचाही वाढदिवस होता. दुपारी सुतारदरा येथील राहत्या घरून तो दुचाकीवरून बाहेर पडला, तेव्हा चार हल्लेखोरानी त्याला घेरून जबरदस्त गोळीबार केला. यातल्या चार गोळ्या मोहोळ याला लागल्यात. त्याच्यावर वनाज येथील सह्याद्री हॅास्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
advertisement
कोण आहे शरद मोहोळ?
पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून मोहोळची ओळख आह. शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचा अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. मोहोळ आणि आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याने दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता. मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव या दोघांनी 2012 मध्ये कातील सिद्दीकीचा येरवडा जेलमध्ये खून केल्याचा आरोप आहे. या खटल्यातून त्याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर शरद मोहोळवर याशिवाय मोक्का अनव्यये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
कुख्यात गुंड शरद मोहोळचा गेम ओव्हर, लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement