पहिल्या घटनेत दोन महिला बुरखा घालून सराफी दुकानात आल्या. मंगळवारी सायंकाळी त्या बंडगार्डन रस्त्यावरील एका सराफी दुकानात आल्या. दोघी सोनं खरेदी करण्यासाठी आलो असल्याचं सांगू लागल्या. यानंतर त्यांनी दागिने पाहण्यासही सुरूवात केली. महिलांनी कर्मचाऱ्यांना दुकानातील दागिने दाखविण्यास सांगितलं. यानंतर दागिने खरेदीचा बहाणा करुन या महिलांनी 4 लाख 74 हजार रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेले.
advertisement
ना ओटीपी, ना कॉल; स्मार्टफोन नसतानाही खात्यातून लाखो लंपास, पीठ गिरणी कामगारासोबत अजब घटना
सोन्याचे कडे चोरीला गेल्याचं लक्षात येताच दुकानातील रोखपालाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासलं आहे आणि पसार महिलांचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
दुसरी घटना कोंढवा भागातील विठ्ठल मंदिराजवळ घडली. इथे असलेल्या एका सराफी दुकानात शुक्रवारी चोरी झाली. या घटनेतही सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या महिलांनी सराफ व्यावसायिकाला बोलण्यात अडकवलं. यानंतर त्यांचं लक्ष नसल्याची संधी साधून 20 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. याबाबत सराफी व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पसार झालेल्या महिलांनी बुरखा परिधान केल्याचं सराफ व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटलं आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
