ना ओटीपी, ना कॉल; स्मार्टफोन नसतानाही खात्यातून लाखो लंपास, पीठ गिरणी कामगारासोबत अजब घटना

Last Updated:

कीपॅड मोबाईल वापरणाऱ्य़ा पीठ गिरणी कामगाराचे लाखो रूपये सायबर चोरट्यांनी लंपास केले आहेत. विशेष म्हणजे त्यांना कसलाही ओटीपी किंवा फोनही आला नाही.

खात्यातून लाखो लंपास (प्रतिकात्मक फोटो)
खात्यातून लाखो लंपास (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेकदा हे गुन्हेगार मोबाईलवर लिंक किंवा ओटीपी पाठवून खातं रिकामं करतात. मात्र, आता पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. यात कीपॅड मोबाईल वापरणाऱ्य़ा पीठ गिरणी कामगाराचे लाखो रूपये सायबर चोरट्यांनी लंपास केले आहेत. विशेष म्हणजे त्यांना कसलाही ओटीपी किंवा फोनही आला नाही.
सिंहगड रस्ता परिसरातील नन्हेगाव येथून ही घटना समोर आली आहे. ही घटना जेवढी धक्कादायक आहे, तितकीच ती अत्यंत हृदयद्रावकही आहे. कारण, हा पीठ गिरणी कामगार एका पायाने अपंगही आहे.. मात्र, कष्ट करून त्यानी आपली आयुष्यभराची कमाई साठवून ठेवली होती. ही कमाई सायबर चोरट्यांनी काही क्षणातच लंपास केली. त्यांच्या खात्यातून 7 लाख 61 हजाराची रक्कम लंपास झाली आहे.
advertisement
चंद्रकांत शिंदे असं या कामगाराचं नाव असून घटनेनंतर शिंदे दाम्पत्याने मोठ्याने आक्रोश केला. हे दृश्य पाहून पोलिसांचाही जीव कालविला. चंद्रकांत शिंदे यांच्या बँक खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून रक्ताचं पाणी करून ते हे पैसे साठवले होते. आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली ही ते पुढील भविष्यासाठी आणि उपचारांसाठी वापरणार होते. मात्र, क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. सायबर चोरट्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी ओरबाडून नेली. त्यामुळे पती पत्नीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
advertisement
यात विशेष बाब म्हणजे शिंदे कीपॅड मोबाईल वापरतात. चंद्रकांत शिंदे हे स्मार्ट फोन वापरत नाही. इंटरनेट बँकिंग किंवा युपीआयचा वापर ते करत नाहीत. त्यांना कसलाही ओटीपी किंवा फोनही आला नाही. तरीही त्यांच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब झाल्याने चोरट्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने ही फसवणूक केली असावी, असा अंदाज लावला जात आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
ना ओटीपी, ना कॉल; स्मार्टफोन नसतानाही खात्यातून लाखो लंपास, पीठ गिरणी कामगारासोबत अजब घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement