Alcohol Fact : दारू प्यायल्याने थंडी वाजत नाही, हे खरं आहे का? एक्सपर्ट्स काय सांगतात?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पण खरंच दारु प्यायल्याने थंडी वाजत नाही का? यामागचं सायन्स काय आहे, एक्सपर्ट्स काय सांगतात? चला सविस्तर जाणून घेऊ
कोणत्याही प्रकारची दारु आरोग्यासाठी हानिकारकच आहे त्यामुळे ती न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण असं असलं तरी असे अनेक लोक आहेत जे दररोज दारु पितात. तर काही लोक क्वचित कधी एखाद्या कार्यक्रमाला दारु पितात. त्यात थंडी वाढली की लोकांचा दारु पिण्याचा कल थोडा वाढतो. तुम्ही अनेकदा लोकांना असं बोलताना ऐकलं असेल की "बाहेर खूप थंडी आहे, चला आज दारू पिऊया, लगेच गर्मी येईल." किंवा "थंडी वाजत असेल तर एक पेग मार लगेच थंडी उडून जाईल", वैगरे वैगरे.....
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शरीराला तात्पुरती 'ऊब' का जाणवते?दारू प्यायल्यानंतर काही क्षणांसाठी आपल्याला शरीर गरम झाल्यासारखे वाटते, यामागे वैज्ञानिक कारण आहे, ते म्हणजे रक्त वाहिन्या अरुंद होणं अल्कोहोल (दारू) रक्ताभिसरण करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील स्नायूंच्या ऊतींना (Muscular Tissues) शिथिल करते आणि त्यांना रुंद (Dilate) करते. यामुळे शरीरातील रक्त त्वचेच्या दिशेने अधिक वेगाने वाहू लागते. त्वचेच्या पृष्ठभागाखालील रक्तवाहिन्या रुंद झाल्याने त्वचेला जास्त रक्त मिळते आणि त्यामुळे त्वचेला तात्पुरती 'उबदार' (Warm) भावना येते.
advertisement
advertisement
advertisement
जेव्हा बाहेर थंडी असते, तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे त्वचेकडे होणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि शरीराची उष्णता बाहेर पडण्यापासून रोखली जाते. परिणामी, शरीराचे मुख्य तापमान (Core Temperature) टिकून राहते. थंडी वाजणे (कंपकपी) ही शरीराची स्वतःला गरम ठेवण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलचे सेवन केल्याने ही नैसर्गिक प्रक्रिया बाधित होते:
advertisement
अल्कोहोल ही थंडी वाजण्याची किंवा शरीरातील अवयव काम करण्याची क्रिया कमी करते. यामुळे शरीर स्वतःला गरम ठेवण्याची त्याची नैसर्गिक क्षमता गमावते. रक्तवाहिन्या रुंद झाल्याने त्वचेकडे रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे शरीरातील उष्णता वातावरणात लवकर मिसळते. परिणामी, शरीराचे मुख्य तापमान (Core Body Temperature) वेगाने घटू लागते, जे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
advertisement
advertisement
म्हणून, दारू प्यायल्याने थंडी वाजत नाही, हा केवळ एक भ्रम आहे. प्रत्यक्षात, दारू शरीराच्या नैसर्गिक तापमान नियंत्रण प्रणालीमध्ये अडथळा निर्माण करते आणि शरीर थंड पडण्यास कारणीभूत ठरते. थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दारूऐवजी गरम कपडे घालणे, गरम पेय पिणे आणि योग्य आहार घेणे हे अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहेत.
advertisement


