हॉरर चित्रपटांची 'बाप' आहे ही फिल्म; हादरवणारा प्रत्येक सीन, रात्री पडेल डेंजर स्वप्न
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Horror Movie on OTT : ओटीटीवरील एक फिल्म सर्व हॉरर फिल्मची बाप आहे. एकदा पाहायला घेतल्यावर पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्ही उठूच शकत नाही.
काही कथा अशा असतात की त्या फक्त घाबरवत नाहीत, तर पाहणाऱ्याला आतून हादरवून टाकतात. अशा कथांच्या मागे अशी वास्तवता दडलेली असते की ज्यामुळे कोणाचीही रात्रीची झोप उडून जाईल. अशा फिल्म पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात फक्त एकच विचार येतो, ज्याच्या सोबत हे खरोखर घडले, त्यांनी हे सगळं कसं सहन केलं असेल? आज आपण अशाच एका भयानक चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. ही फिल्म सत्य घटनेवर आधारित आहे. ही फिल्म तुम्ही पूर्ण पाहू शकणार नाही. यातील प्रत्येक सीन तुम्हाला प्रचंड घाबरवतील.
advertisement
advertisement
advertisement
7 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटर्समध्ये हा हॉरर चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आंगी उम्बारा यांनी केले होते. या चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे यात बहुतांश तरुण कलाकार दिसले. चित्रपटात अधिश्टि जारा, रतु सोफ्या, सास्किया चॅडविक, कनीशिया युसुफ आणि खदीजाह अरूमा दिसले होते. कथा आणि वातावरण मिळून हा असा अनुभव देतात जो नेहमीच्या हॉरर चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. पाहणाऱ्यांना यात एक विचित्र भीती आणि बेचैनी जाणवते.
advertisement
'मुनकर' असं या चित्रपटाचं नाव आहे. ज्याची कथा एका विद्यार्थिनीभोवती फिरते, जिला तिच्याच कॉलेजमधील काही मुली सतत त्रास देत असतात. परिस्थिती इतकी बिघडते की एकेदिवशी त्या मुलींपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात ती एका भयानक घटनेची बळी ठरते. या घटनेनंतर तिचे आई–वडील खूपच तुटून जातात आणि ते एका व्यक्तीची मदत घेतात, जो तिच्या आत्म्याला परत बोलावतो. त्यानंतर तिचा आत्मा तिला त्रास देणाऱ्यांपासून बदला घेण्यासाठी बाहेर पाडतो. ही कथा ‘हरलीना’ या लोककथेतून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.
advertisement
'मुनकर' या चित्रपटाला रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी याची कथा आणि हॉरर वातावरणाची खूप प्रशंसा केली, तर काहींचं मत होतं की यात आणखी वेग असू शकला असता. IMDb वर याला 5.2/10 रेटिंग आहे. अधिकृत बजेट किंवा बॉक्स ऑफिस कमाई जाहीर झाली नसली तरी, सांगितले जाते की या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कामगिरी केली. चित्रपटाची कथा पाहणाऱ्यांना आतपर्यंत हादरवून गेली होती.
advertisement


