Vasai Crime : मित्राची प्रॉपर्टी पाहून नियत बिघडली, त्याच्यात घरात केला कांड,पोलिसांनाही कळलं नाही, वसईतली डोकं चक्रावून टाकणारी घटना

Last Updated:

मित्रांची संपत्ती पाहून दुसऱ्या एका मित्राची नियत फिरली होती. आणि त्याने कट रचून मित्राच्याच घरात मोठा कांड केला होता.या कांडनतर तो शांत बसला नाही. उलट त्याने मित्राच्या बायकोसोबत पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची तक्रार दिली होती.

AI image
AI image
Vasai Crime News : विजय देसाई, प्रतिनिधी, वसई : वसईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मित्रांची संपत्ती पाहून दुसऱ्या एका मित्राची नियत फिरली होती. आणि त्याने कट रचून मित्राच्याच घरात मोठा कांड केला होता.या कांडनतर तो शांत बसला नाही. उलट त्याने मित्राच्या बायकोसोबत पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर आरोपी मित्र पोलिसांसोबत तपासात देखील त्यांना सहकार्य करत होता.अशा या थरारक घटनेची पोलिसांनी नेमकी उकल कशी केली आहे? हे जाणून घेऊयात.
वसईच्या दामुपाडा परिसरातील एका घरात 18 नोव्हेंबरला 2025 ला एक दरोडा पडला होता.चित्रसेन राऊत यांच्या घरात हा दरोडा पडला होता. मंगळवारी दुपारी ज्यावेळेस चित्रसेन यांची बायको आणि लहान मुलगा घरात होते, त्याचवेळेस तीन आरोपींना घरात शिरून चाकूचा धाक दाखवून घरातील सोनेच्या चांदीच्या दागिन्यांबद्दल विचारणा केली होती.पण महिलेने नकार दिल्यानंतर आरोपींपैकी एकाने त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र वार चुकला तरी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती.यानंतर आरोपींनी कपाटातील 12 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल असा ऐवज घेऊन आरोपी फरार झाले होते.
advertisement
या घटनेनंतर चित्रसेन राऊत यांचा मित्र त्यांच्या घरी आला.त्यानंतर राऊत यांच्या बायकोने त्यांचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर दोघांनी वालीव पोलिस ठाणे गाठून संबंधित प्रकरणाची तक्रार केली होती.या तक्रारीनंतर चित्रसेन राऊत यांच्या मित्राने पोलिसांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या तपासावर लक्ष ठेवले होते. या दरम्यान पोलीस तपास करत होते, पण त्यांना कुठलाग सुगावा लागत नव्हता.त्यानंतर गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली होती. तसेच आरोपी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात पळून गेल्याचीही माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी तत्काळ विशेष पथक तयार करून तीनही आरोपींना ताब्यात घेतले होते. अशोक उर्फ बाबू राजू शिंदे,अब्दुल रऊफ हाशमी,रितीक रची बेलंगी अशी या तीन आरोपींची नावे होते.या आरोपींकडून पोलिसांनी 8 तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल,रोख रक्कम असा एकूण 10,00,000 किमतीचा ऐवज ताब्यात घेतला होता.
advertisement
दरम्यान पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक केली होती.पण मुख्य आरोपी अजूनही फरार होता. पण या तीन आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलीस मुळ आरोपी काळू प्रभाकर साहू यांच्यापर्यंत पोहोचली होती.यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने चित्रसेन राऊत यांच्या घरी सतत येत जात असल्याने संपत्ती पाहून नियत फिरली होती.त्यामुळे मित्राच्या घरी दरोडा टाकण्याचा प्लान आखला होता.
advertisement
आरोपी साहू याने अशोक उर्फ बाबू राजू शिंदे या गुन्हेगाराला हाताशी धरून बिगारीचे काम करणारे कामगार यांना पैशाचा आमिष दाखवून नुर हसन खान, सुरज किशोर जाधव यांनी मिळून घराची रेकी केली.त्यानंतर दुपारच्या सुमारास घरात घूसून दरोडा टाकला होता.
दरम्यान वसईतील दामुपाडा परिसरात घडलेल्या थरारक दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखा- कक्ष 2, वसई यांनी अवघ्या 48 तासांत गजाआड केले असून तब्बल 10 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच आरोपीविरूद्ध वालीव पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०९, ३११, ३०९(६), ३३२(बी), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vasai Crime : मित्राची प्रॉपर्टी पाहून नियत बिघडली, त्याच्यात घरात केला कांड,पोलिसांनाही कळलं नाही, वसईतली डोकं चक्रावून टाकणारी घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement