TRENDING:

Pune : पुण्याच्या रस्त्यावर गुंडांचा हैदोस, तरुणाला किडनॅप केलं, विवस्त्र करून हल्ला, गोळीबारही केला!

Last Updated:

पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गुंडांनी हैदोस घातला आहे. गुंडांनी एका 31 वर्षांच्या तरुणाचं अपहरण केलं आणि त्याला विवस्त्र करून मारहाण केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गुंडांनी हैदोस घातला आहे. कात्रज-कोंढवा रोडवर गुंडांनी एका 31 वर्षांच्या तरुणाचं अपहरण केलं आणि त्याला विवस्त्र करून मारहाण केली, तसंच गोळीबारही केला आहे. आर्थिक वादातून हा प्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी हे कोंढवा परिसरातील रहिवासी आहेत. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पुण्याच्या रस्त्यावर गुंडांचा हैदोस, तरुणाला किडनॅप केलं, विवस्त्र करून हल्ला, गोळीबारही केला! (AI Image)
पुण्याच्या रस्त्यावर गुंडांचा हैदोस, तरुणाला किडनॅप केलं, विवस्त्र करून हल्ला, गोळीबारही केला! (AI Image)
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन खरेदी-विक्री व्यवसायात सहभागी असलेला पीडित हादेखील कोंढवा भागात राहत होता आणि आरोपींच्या परिचित होता. 31 डिसेंबर रोजी त्यांच्यात आर्थिक व्यवहारांवरून वाद झाला. या वादादरम्यान आरोपींनी पीडित तरुणावर हल्ला केला आणि त्याला जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले.

रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणाला कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर परिसरात एका मोकळ्या मैदानावर नेण्यात आलं. तिथे आरोपींनी तरुणाला विवस्त्र केलं आणि त्याला बेदम मारहाण केली. आरोपींनी या हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. पोलिसांकडे तक्रार केली तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू अशी धमकी आरोपींनी पीडित तरुणाला दिली. यानंतर एका आरोपीने गाडीत ठेवलेले पिस्तूल बाहेर काढले आणि पीडित तरुणाला धमकावले आणि गोळीबारही केला.

advertisement

मानसिक धक्का बसलेला असतानाही पीडित तरुण रविवारी येवलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर कलंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर पोलीस उपनिरीक्षक खराडे यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

या घटनेमुळे पुण्यात वाढत असलेल्या गुन्हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. पोलिसांच्या नोंदींवरून मागच्या वर्षी शहरात 79 हत्या, 153 हत्येचे प्रयत्न आणि 1,453 गंभीर गुन्हे घडले आहेत. 2024 च्या तुलनेत गंभीर गुन्ह्यांमध्ये 14 ते 15 टक्क्यांची घट झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पण हत्या, हल्ले आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्याच्या रस्त्यावर गुंडांचा हैदोस, तरुणाला किडनॅप केलं, विवस्त्र करून हल्ला, गोळीबारही केला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल