हरमन कंपनीने महाराष्ट्रात केलेल्या गुंतवणुकीमुळे प्रगत ऑटोमोटिव्ह उत्पादनाचे स्थान मजबूत होत आहे. शिवाय, केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड' संकल्पनेलाही उत्तम चालना मिळणार आहे. या गुंतवणुकीत तात्काळ विस्तारासाठी 45 कोटी रूपये (US$ 5.5 दशलक्ष) आणि पुढील तीन वर्षांत प्रगत टेलिमॅटिक्स आणि पुढील पिढीतील ऑटोमोटिव्ह कनेक्टिव्हिटी कार्यक्रमांना पाठिंबा देण्यासाठी अतिरिक्त 300 कोटी रूपये (US$ 36.5 दशलक्ष) यांचा समावेश आहे.
advertisement
नवीन वचनबद्धतेसह, 2014 पासून पुण्यातील प्लांटमध्ये हरमनची एकूण गुंतवणूक आता 554 कोटी रूपये (US$67 दशलक्ष) पर्यंत पोहोचली आहे. या विस्तारामुळे 2027 पर्यंत पुण्यात 300 नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. हा विस्तार भारत सरकारच्या "मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड" व्हिजनला बळकटी देणार आहे. शिवाय, कनेक्टेड आणि शाश्वत गतिशीलता उपायांच्या प्रगत ऑटोमोटिव्ह उत्पादनासाठी एक अग्रगण्य जागतिक केंद्र म्हणून देशाचे स्थान मजबूत करतो. हा प्लांट दरवर्षी 4 दशलक्ष कार ऑडिओ घटक, 1.4 दशलक्ष इन्फोटेनमेंट युनिट्स आणि 0.8 दशलक्ष टेलिमॅटिक्स युनिट्सचे उत्पादन करेल.
हार्मनचे सीईओ ख्रिश्चन सोबोट्का यांनी सांगितले, “ही गुंतवणूक भारताप्रती आमची वचनबद्धता दर्शवतेय. पुणे हे कनेक्टेड कार तंत्रज्ञानाचे भविष्य घडवत आहे.” हार्मनचा पुणे कारखाना टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, महिंद्रा यांसारख्या भारतीय ग्राहकांसह युरोप आणि उत्तर अमेरिकेतील ग्राहकांनाही सेवा पुरवतो. नवीन विस्तारात 71,505 चौरस फूट क्षेत्रफळ वाढेल आणि चार नवीन एसएमटी लाईन्स जोडल्या जातील. यामुळे 5G टेलिमॅटिक्स आणि हार्मन रेडी कनेक्टचे उत्पादन शक्य होईल. या सुविधेत 2030 पर्यंत 100 टक्के हरित ऊर्जा वापराचे उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जेद्वारा दरवर्षी 3,17,000 किलोवॅट-अवर वीजची निर्मिती होते, ज्यामुळे 200 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी होते. भारतातील हार्मनची 5 हजार सदस्यांची टीम उत्पादन, अभियांत्रिकी आणि गुणवत्तेत योगदान देते, ज्यामुळे भारत जागतिक ऑटोमोटिव्ह नवोन्मेषाचे केंद्र बनला आहे.
