TRENDING:

पैलवानांचं एनर्जी ड्रिंक कधी प्यायलात का? पुण्यात मिळतेय आरोग्यदायी थंडाई, Video

Last Updated:

पैलवानांसाठी थंडाई अतिशय फायदेशीर आहे. यामुळे शरीराला प्रोटीन व फायबर मिळण्यास मदत होते. ही थंडाई बनते कशी पाहू या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : एखाद्या पैलवानाला पाहिलं की आपल्याला प्रश्न पडतो की ते नेमक काय खात असतील? केळी, दूध आणि अंडी हा त्यांचा सर्वसाधारण आहार सर्वांना माहिती असतोच. पण या व्यतिरिक्त महत्वाचं काय असेल तर ती थंडाईच असते. पैलवानांचं एनर्जी ड्रिंक मानली जाणारी थंडाई शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड राहण्यास मदत होते. पुण्यात पैलवान नेताजी जाधव यांची 'पैलवान थंडाई' प्रसिद्ध असून ती पिण्यासाठी नेहमीच गर्दी असते.

advertisement

पैलवानांसाठी एनर्जी ड्रिंक

पैलवानांच्या आहारात थंडाईला खूप महत्त्व असते. तालमीत घाम गाळल्यानंतर होणारी शरीराची झीज भरून काढण्याचं काम थंडाई करत असते. त्यामुळे पैलवानांचं हे एनर्जी ड्रिंक त्यांना अगदी अमृतासमान मानलं जातं. थंडाईत प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पैलवानांच्या आहारामध्ये थंडाई असतेच, असे पैलवान जाधव सांगतात.

View More

उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पेक्षा भारी; 5 मिनिटांत घरीच बनवा चिंचेचे पन्हे, पाहा रेसिपी Video

advertisement

पुण्यातील प्रसिद्ध पैलवान थंडाई

पैलवानांसोबतच सर्वसमान्यांनाही थंडाई आरोग्यदायी आहे. त्यामुळे पुण्यातील पैलवान नितीन जाधव यांनी थंडाई विक्री सुरू केलीय. हिंजवडीच्या साखरे वस्ती कॉलनी येथे प्रसिद्ध पैलवान थंडाई आहे. गेल्या 4 वर्षांपासून या ठिकाणी थंडाई बनवून ते विकत आहेत.

कशी बनते थंडाई?

थंडाई बनवताना बदाम, विलायची, खसखस, धने, मगज बी, बडीशेप आणि गुलाब पाकळ्या, साखर आदींचा वापर केला जातो. मोठ्या दगडी उकाळात थंडाई बनवली जाते. सर्व पदार्थांचं रगडून प्लेन दूध काढलं जातं. हे मिश्रण दुधात टाकून पुन्हा मिक्स करून घेतलं जातं. थंडाई दुधासह किंवा नुसतीच घेतली जाते, असेही पैलवान सांगतात.

advertisement

मेहनत थोडी पण चवीला लय भारी, उन्हाळ्यात असे बनवा तांदळाचे सालपापड, Video

थंडाई पिण्याचे फायदे

थंडाईमुळे शरीरातील उष्णता कमी होते. चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. तसेच शांत झोप देखील लागते. यामधून चांगल्या प्रकारे एनर्जी मिळते. त्यामुळे पैलवानांसोबत ही थंडाई सर्वसामन्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, असे पैलवान जाधव यांनी सांगितले.

मराठी बातम्या/पुणे/
पैलवानांचं एनर्जी ड्रिंक कधी प्यायलात का? पुण्यात मिळतेय आरोग्यदायी थंडाई, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल