सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. यासाठी पाच महिन्यांपासून मोहिम राबविली जात असूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने आता चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पुण्यातील परिस्थिती पाहता सध्या 26 लाखांहून अधिक वाहनांना ही नंबरप्लेट बसवायची आहे. रोझमार्टा कंपनीला हे काम सोपविण्यात आले असून, फिटमेंट केंद्रांवर प्रक्रिया सुरू आहे.
advertisement
Niradhar Yojana: संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले नाहीत? लगेच करा हे काम!
19 लाख वाहनांवर अजूनही नंबरप्लेट नाही
सध्या फक्त पावणे आठ लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी साडेपाच लाखांनी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. तरीही तब्बल 19 लाख वाहनधारकांनी नोंदणी केलेली नाही. ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांनाही सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतची तारीख दिली आहे. त्यामुळे प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे.
राज्यातील केवळ 15 ते 17 टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट लावली आहे. अनेकांना 15 ऑगस्टपर्यंत नंबरप्लेट बसविणे शक्य झाले नाही. ग्रामीण भागात फिटमेंट केंद्रांची संख्या कमी आहे. काही फिटमेंट केंद्र बंद झाल्याने मागणी वाढली आहे.
लगेच बसवून घ्या नंबर प्लेट
आता 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत असल्याने वाहनधारकांनी तत्काळ नोंदणी करून नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे परिवहन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. 1 डिसेंबरपासून नियमभंग करणाऱ्यांवर दंडासह कडक कारवाई होणार आहे.






