राज्यभरातून चारचाकी वाहनांची चोरी; 48 तासांचा सापळा अन् 30 किमी पाठलाग, चोरट्यांच्या अटकेचा थरार

Last Updated:

३१ डिसेंबर रोजी बावधन बुद्रुक येथून नागेश शिंदे यांची गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ९० सीसीटीव्ही फुटेजेस तपासले.

चोरट्यांच्या अटकेचा थरार (AI Image)
चोरट्यांच्या अटकेचा थरार (AI Image)
पुणे : पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी फिल्मी स्टाईलने ३० किलोमीटर पाठलाग करून आंतरजिल्हा वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून चोरीच्या ५ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
९० सीसीटीव्ही आणि ४८ तासांचा सापळा: ३१ डिसेंबर रोजी बावधन बुद्रुक येथून नागेश शिंदे यांची गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ९० सीसीटीव्ही फुटेजेस तपासले. तांत्रिक तपासादरम्यान, चोरीचे वाहन घेऊन काही संशयित भुगाव रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्या भागात ४८ तास पाळत ठेवली.
advertisement
३० किलोमीटर थरारक पाठलाग: संशयित आरोपींनी पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हार न मानता तब्बल ३० किलोमीटरपर्यंत त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि अखेर सापळा रचून तिघांना जेरबंद केले.
धनाजी नागनाथ लोकरे (३५, रा. माढा, सोलापूर), दत्तात्रय उर्फ सतीश सदाशिव जाधव (३५, रा. उरळी देवाची), अमित नागनाथ गवळी (३०, रा. मोहोळ, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. यातील धनाजी याच्यावर यापूर्वी १० गुन्हे दाखल आहेत. सतीश याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत आणि अमित याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत.
advertisement
आरोपींच्या चौकशीतून बावधन, चाकण, सासवड आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरातील वाहनचोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलिसांनी केली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
राज्यभरातून चारचाकी वाहनांची चोरी; 48 तासांचा सापळा अन् 30 किमी पाठलाग, चोरट्यांच्या अटकेचा थरार
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement