Niradhar Yojana: संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले नाहीत? लगेच करा हे काम!

Last Updated:

Sanjay Gandhi Niradhar Yojana: संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गेल्या सहा महिन्यांपासून महिलांना मिळाले नाहीत. त्यासाठी लगेच कागदपत्रांत दुरुस्ती करावी लागेल.

Niradhar Yojana: लगेच करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत निराधार योजनेचे पैसे!
Niradhar Yojana: लगेच करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत निराधार योजनेचे पैसे!
पुणे: संजय गांधी निराधार योजनेतील अनेक महिलांना मागील सहा महिन्यांपासून हप्ते मिळालेले नाहीत. प्रशासनानुसार, सर्व योजनांचे निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ‘डीबीटी’ पद्धतीने पाठवले जातात. मात्र त्यासाठी आधारकार्ड अद्ययावत करून ते बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.
नाव आणि तपशीलात विसंगती
अनेक लाभार्थ्यांच्या आधारकार्डवरील नाव व बँक खात्यावरील नावात फरक आहे. काहींच्या आधारकार्डशी मोबाइल क्रमांक जोडलेला नाही. यामुळे निधी हस्तांतरणात अडथळा येत आहे. लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी जोडून त्याची छायांकित प्रत तहसीलदार कार्यालयात तातडीने जमा करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
चुकीच्या माहितीचा महिलांना फटका
नावातील बदल, चुकीचा पत्ता किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे अनेकांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सोपे आणि जलद मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक स्तरावर होत आहे.
डीबीटी’ म्हणजे काय?
डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) म्हणजे थेट लाभ हस्तांतरणाची पद्धत. महाराष्ट्रात ही प्रणाली टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. सरकारने यासाठी ‘महाडीबीटी’ नावाचे एकत्रित पोर्टल तयार केले असून, विविध विभागांच्या योजनांचे लाभ या पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या आधारकार्डाशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केले जातात.
advertisement
लाभार्थी महिलांचा निधी थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. यासाठी आधारकार्ड अद्ययावत करून ते बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. त्याची छायांकित प्रत तहसीलदार कार्यालयात सादर करावी. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्ते पूर्ववत सुरू होतील, असे अमोल कदम, तहसीलदार (संजय गांधी योजना) हवेली यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Niradhar Yojana: संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाले नाहीत? लगेच करा हे काम!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement