महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, राज्यात आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच वादळाचा देखील हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
[caption id="attachment_1235920" align="alignnone" width="1200"]
advertisement
" width="1200" height="900" /> पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान ढगाळ राहणार असून,अधूनमधून 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.[/caption]
कोकणात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकणात पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
विदर्भात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.