पारंपरिक कलांच्या पंढरीत असलेल्या पुणे शहराने तंत्रज्ञानाच्या नव्या वळणावर पाऊल टाकत, यंदाच्या गणेशोत्सवात एक अनोखी कामगिरी केली आहे. प्रथमच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून गणपतीची 3D मूर्ती साकारण्यात आली आहे.
Ganeshotsav 2025: पुण्याचे बाप्पा सातासमुद्रापार, मागणी 60 टक्क्यांनी वाढली, किती येतो खर्च?
शहरातील इंद्रजीत जोशी यांनी, पारंपरिक शिल्पकलेचा आत्मा जपत, अत्याधुनिक AI सॉफ्टवेअरच्या मदतीने ही मूर्ती डिझाइन केली आहे. सर्वप्रथम गणपतीची मूळ रचना संगणकावर AI मॉडेलद्वारे तयार करण्यात आली. यानंतर 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून मूर्तीचे अचूक स्वरूप घडवण्यात आले.
advertisement
पुण्यातील तरुण इंद्रजीत जोशी यांचा रॅट 3D प्रिंटिंग आणि स्कॅनिंगचा डिजिटल व्यवसाय आहे. यावर्षी या गणेशोत्सवासाठी त्यांनी ट्रायमोड लेसर स्कॅनरचा वापर करून 3D गणेश मूर्ती साकारली आहे. मूर्ती स्कॅन करताना त्यांनी पर्यावरणाला कोणतीही इजा पोहोचणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. 18 इंच, 8 इंच आणि 3 इंच या आकाराच्या मूर्ती ते स्कॅनिंगद्वारे साकारतात.
मूर्तीला कोणतीही हानी नाही
IR मोड, texture मोड आणि लेसर मोडच्या मदतीने तयार करण्यात येणाऱ्या मूर्तीला कोणतीही हानी पोहोचत नाही. पूर्णपणे वायरलेस 3D स्कॅनिंग करून गणपती मूर्ती साकारण्यात येते.