TRENDING:

वडगाव शेरी मतदारसंघात राजकीय भूकंप होणार, नाराज जगदीश मुळीक यांचे जनतेला खुले पत्र

Last Updated:

Jagdish Mulik : जिथे ज्याचा विद्यमान आमदार तिथे त्याला उमेदवारी हे सूत्र ठरल्याने आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे गृहीत धरून जगदीश मुळीक यांनी राजकीय हालचाली किंबहुना चाचपणी सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार असल्याने वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही, हे निश्चित झाल्याने भाजपचे नाराज नेते जगदीश मुळीक यांनी तिकरी चाल खेळायला सुरूवात केली आहे. जगदीश मुळीक यांनी थेट मतदारसंघातल्या जनतेलाच खुले पत्र लिहून विधानसभेला आशीर्वादाची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेने राष्ट्रवादी आणि भाजपमधला वाद नक्कीच वाढणार असल्याचे चित्र आहे.
जगदीश मुळीक (भाजप नेते)
जगदीश मुळीक (भाजप नेते)
advertisement

अजित पवार यांची महायुतीत एन्टी झाल्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणे पूर्णत: बदलून गेली आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारी हा अलिखित नियम महायुतीने विधानसभेला जागावाटपासाठी ठरवला आहे. हेच धोरण गृहीत धरून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे पाहून जगदीश मुळीक यांनी राजकीय हालचाली किंबहुना चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी थेट मतदारसंघातील जनतेलाच खुले पत्र लिहिले आहे. त्यामुळे जागावाटप करताना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पेच वाढला आहे.

advertisement

लाडक्या लेकाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न, भास्कर जाधवांचे चिरंजीव अजितदादांच्या भेटीला

2019 विधानसभेला थोडक्यात पराभव झाला मात्र दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. आमदार असताना काम केले. शहराध्यक्ष असताना तत्कालीन सरकारला धारेवर धरले. आता विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद मला पुन्हा हवे आहेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल, असे आवाहन करून एकप्रकारे विधानसभा लढण्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.

advertisement

जगदीश मुळीक यांनी पत्रात काय लिहिले आहे?

नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो,

पत्ररूपाने तुमच्याशी संवाद साधताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल तुमच्या सहकार्याने बहरली. तुमचे प्रेम, साथ आणि आशीर्वाद भरभरून लाभले. माझ्यासाठी हे आशीर्वाद बहुमोल आहेत. माझ्या विस्तारीत कुटुंबाशी म्हणजेच तुमच्याशी संवाद साधताना खूप समाधानाची भावना आहे. कुटुंबातूनच मला समाजकार्याचे बाळकडू मिळाले. समाजकारणाचा पिंड जोपासला गेल्यानेच २००१ मध्ये विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय प्रवास सुरू झाला. २०१४ मध्ये वडगावशेरी मतदारसंघाचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी तुमच्यामुळेच लाभली. त्या पाच वर्षांत आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतदारसंघाला एक नवे रूप दिले. भामा आसखेड, शंभर खाटांचे रुग्णालय, मेट्रो, उड्डाणपुल यांसारखे अनेक प्रकल्प मार्गी लावले. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कृतीशील राहिलो. आपल्या अथक प्रयत्नांनंतरही २०१९ साली विधानसभा गाठण्यात थोडक्यात अपयश आले. पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. तुमची साथ होतीच, त्यामुळे दुप्पट जोमाने लढण्यासाठी, समाजसेवेसाठी सज्ज झालो.

advertisement

भाजपचा शहराध्यक्ष असताना राज्यातील त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना आधार देण्याची आणि आरोग्यसेवा पुरवण्याची गरज होती. ती पक्षसंघटनेच्या माध्यमातून पूर्ण केली. विकासकामांसाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आंदोलने केली, पक्ष संघटना वाढवली आणि मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहिलो. शिक्षक सन्मान, विद्यार्थी सत्कार, महिला सन्मान, आरोग्य शिबिरे, स्पर्धांचे आयोजन, सर्व सार्वजनिक उत्सव, बागेश्वर धाम, जया किशोरी यांचे प्रवचन अशा अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत गेलो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवे आहेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल. याच हेतूने आपल्याशी हा संवाद. तुमचे सहकार्य लाभेल हा विश्वास आहे.

मराठी बातम्या/पुणे/
वडगाव शेरी मतदारसंघात राजकीय भूकंप होणार, नाराज जगदीश मुळीक यांचे जनतेला खुले पत्र
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल