नेमका प्रकार काय?
वारूळवाडी येथील रहिवासी अनिकेत डोंगरे हे मंगळवारी आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील कटरच्या साहाय्याने कापले. चोरट्यांनी कपाटातील सहा तोळे सोन्याचे दागिने, सव्वा किलो चांदी आणि ६० हजार रुपयांची रोकड असा एकूण पावणेचार लाखांहून अधिक किमतीचा ऐवजी चोरून नेला.
advertisement
Pune News: लग्नाची एवढी घाई! खोटं वय सांगून आळंदीत उरकला विवाह, सासऱ्याचीच जावयाविरोधात पोलिसांत धाव
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला: डोंगरे यांच्या घरात हातसफाई केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील सागर भागवत आणि सोलाट यांच्या घराकडे वळवला. मात्र, भागवत यांच्या घरातील सदस्यांना आवाजामुळे जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा केला. यामुळे चोरटे घाबरले आणि त्यांनी तेथून पळ काढला, ज्यामुळे पुढील मोठी चोरी टळली.
सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद: नारायणगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मंगळवारी मध्यरात्री दोन संशयित तरुण एका दुचाकीवरून परिसरात 'रेकी' करताना दिसून आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या तपासात सामील झाले असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
