TRENDING:

Pune Crime : चोरांच्या भीतीनं पिंपात लपवले दागिने; पण घरी आलेल्या मैत्रिणीनंच केलं कांड, पुण्यातील घटना

Last Updated:

चोरीच्या भीतीने आपल्या घरातील सोन्याचे दागिने कपाटाऐवजी एका वेगळ्या ठिकाणी, म्हणजेच पिंपात लपवून ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : सोनं चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत चांगल्याच वाढल्या आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनेतही प्रचंड वाढ होत आहे. घाबरून लोक घरातील दागिने बँक लॉकरमध्ये ठेवतात. तर, काहीजण घरातच हे दागिने लपवून ठेवतात. पुण्यातून अशा एका महिलेसोबत घडलेली एक घटना समोर आली आहे. यात चोरीच्या भीतीने आपल्या घरातील सोन्याचे दागिने कपाटाऐवजी एका वेगळ्या ठिकाणी, म्हणजेच पिंपात लपवून ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. खडकी परिसरातील इंदिरानगर भागात घडलेल्या या घटनेत पिंपात ठेवलेले एक लाख ९७ हजार रुपये किमतीचे दागिने चक्क एका ओळखीच्याच महिलेने चोरल्याचे उघडकीस आले आहे.
दागिन्यांची चोरी (AI image)
दागिन्यांची चोरी (AI image)
advertisement

याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगरमधील एका ३७ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही फिर्यादीच्या घरात नेहमी ये-जा करणारी आणि अत्यंत ओळखीची होती. घरात मौल्यवान वस्तू ठेवल्यास त्या चोरीला जातील या भीतीने फिर्यादीने हे दागिने कपाटात न ठेवता एका पिंपामध्ये सुरक्षित ठेवले होते.

advertisement

पुण्यातील जोडप्याचा वयाच्या साठीनंतर घटस्फोटासाठी दावा; बँक अकाऊंट भरलेलं तरी पत्नीची पोटगीची मागणी, न्यायालय म्हणालं...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दर घसरलेलेच, सोयाबीन आणि कांद्याची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी महिलेने फिर्यादीचे लक्ष चुकवले आणि पिंपात लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने गुपचूप लंपास केले. चोरी केलेले हे दागिने तिने एका सराफाकडे नेऊन गहाण ठेवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. फिर्यादीने दागिने तपासले असता, ते चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : चोरांच्या भीतीनं पिंपात लपवले दागिने; पण घरी आलेल्या मैत्रिणीनंच केलं कांड, पुण्यातील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल