TRENDING:

Pune Crime News : आता तर हद्दच झाली! भरमेट्रोत महिलेशी अश्लील वर्तन; वृद्धावर गुन्हा दाखल

Last Updated:

Pune Shocking News : पुणे मेट्रोच्या महात्मा फुले मंडई स्थानक परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. 65 वर्षीय वृद्धाने महिला प्रवाशाशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे  : पुणे शहरात गुन्हेगारीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक परिसरातील असून, दुसरी घरफोडीची घटना बाणेर आणि चंदननगर भागात घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
News18
News18
advertisement

महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकात अश्लील प्रकार

विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय एका वृद्धावर मेट्रो प्रवासादरम्यान महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा बिहारमधील मुझफ्फरनगर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी 26 वर्षीय महिला 9 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मेट्रोने प्रवास करत होती. त्यावेळी आरोपीने तिच्याकडे जाणीवपूर्वक एकटक पाहून अश्लील हावभाव केले. याशिवाय त्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून महिलेची छायाचित्रे चोरून टिपण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या लक्षात हा प्रकार येताच तिने त्वरित मेट्रो स्थानकावरील सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. सुरक्षा रक्षकांनी आरोपीला ताब्यात घेऊन मंडई पोलिस चौकीत आणले. पुढील चौकशीनंतर त्याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेनंतर मेट्रोमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

advertisement

बाणेर आणि चंदननगरमध्ये घरफोड्या

दरम्यान, शहरातील दुसऱ्या घटनेत बाणेर आणि चंदननगर भागात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 3 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. बाणेरमधील वीरभद्रनगर परिसरातील एका बैठ्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांनी शयनगृहातील कपाट उचकडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी (8 सप्टेंबर) सकाळी अकराच्या सुमारास घरमालक बाहेर गेल्यानंतर घडली. दुपारी एकच्या सुमारास घरमालक परत आला तेव्हा घरफोडी झाल्याचे उघड झाले. याबाबत त्याने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

advertisement

नागरिकांमध्ये अस्वस्थता

एका बाजूला मेट्रो प्रवासादरम्यान महिलेला छेडछाड आणि अश्लील इशाऱ्यांना सामोरे जावे लागले, तर दुसऱ्या बाजूला घरफोड्यांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन्ही घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime News : आता तर हद्दच झाली! भरमेट्रोत महिलेशी अश्लील वर्तन; वृद्धावर गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल