अकरावीत शिकत असणाऱ्या सृष्टी अडागळे हिने आपल्या खिडकीतून पाहिले असता शेजारच्या उसामधून बिबट्या जात होता. तिने काही क्षणात या बिबट्याचे फोटो देखील आपल्या कॅमेरा मध्ये टिपले आहेत. तात्काळ या संदर्भात वनविभागाला देखील कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाने या परिसरात समक्ष पाहणी केली नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या परिसरात रात्रीच्या वेळी कोणीही एकटे फिरू नये तसेच वस्ती असल्याने या भागात जनावरे बाहेर बांधत असल्याकारणाने शेतकऱ्यांनी बाहेर शेकोटी करून ठेवावी जेणेकरून बिबट्या फिरकणार नाही.
advertisement
बारामतीमध्ये घबराटीचे वातावरण
सकाळी पुन्हा या भागात वनविभाग सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेणार आहेत. बारामती शहरात नगरपरिषदेची निवडणुकीची धामधूम सुरू असताना बिबट्याची दहशत पाहायला मिळाली त्यामुळे नागरिकांमध्ये देखील घबराटीचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना संरक्षण देण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
उत्तर पुण्यात बिबट्याची दहशत
उत्तर पुण्यात बिबट्याने अनेकांच्या नरडीचा घोट घेतलाय. मंचर नगरपंचायतीसह शिरूर, जुन्नर, राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या नगर परिषदेच्या हद्दीत रात्रीच्या प्रचारावर बिबट्याचं सावट दिसून येतंय. बिबट्याचे वाढते हल्ले अन त्यामुळं निर्माण झालेली ही दहशत कमी व्हावी. यासाठी उत्तर पुण्यातील बिबटे गुजरातला स्थलांतर करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय खरा पण त्याची अंमलबजावणी कधी होणार? हा मुद्दा या निवडणुकीच्या प्रचारात ही केंद्रस्थानी आहे.
ऊसतोडीमुळे बिबट्यांचे स्थलांतर
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात लहान मुलांवर बिबट्याने हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहेत. दरम्यान बिबट्याचे हल्ले लक्षात घेता अशा बिबटप्रवण भागात शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.हिवाळा असल्याने अंधार लवकर पडतो त्यामुळे पायी घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यास उशीर होतो. त्यातच रस्त्याच्या कडेने बिबटप्रवण क्षेत्र, ऊसक्षेत्र, जंगल क्षेत्र, डोंगराळ क्षेत्र अनेक ठिकाणी आहे. सध्या ऊसतोडीमुळे उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबटे स्थलांतरीत होत असतात. त्यातच शाळेतून घरी जाणारे लहान मुल हे बिबट्याच्या तावडीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बिबटप्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांच्या वेळेत सकाळी 9:30 ते दुपारी 4:00 असा बदल केला आहे.
