विजय फळणीकर यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा वैभव याचे 2001 साली कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी आपलं घर संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. स्वतः विजय फळणीकर यांचेही बालपण अनाथाश्रमात गेलं होतं. त्यामुळे एका मुलाला दत्तक घेण्याऐवजी अनेक मुलांचे आई-वडील बनण्याचा विचार त्यांनी केला आणि त्यातून या संस्थेचा जन्म झाला.
advertisement
आपलं घरमधून आजपर्यंत 150 पेक्षा जास्त मुलं बाहेर पडली आहेत, तर 19 मुलींची लग्नं संस्थेच्या मदतीने झाली आहेत. कोणतीही सरकारी मदत न घेता, फक्त समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने ही संस्था गेली 25 वर्षे अविरतपणे चालू आहे. आपलं घरमध्ये फक्त अनाथ मुलांसाठी आश्रम नाही, तर वृद्धांसाठी वृद्धाश्रमही आहे. अनाथ मुलांना आजी-आजोबांचं प्रेम मिळावं आणि वृद्धांना नातवांचं प्रेम मिळावं, यासाठी अनाथाश्रम सुरू केल्यानंतर विजय फडणीकर यांनी वृद्धाश्रमही सुरू केलं.





