मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावरील सदनिकेत राहणाऱ्या करुणा मनोज जगताप या स्फोटात होरपळून गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या तरुणाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर तातडीने दोघांनाही लोणी काळभोर येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
घटनेच्या वेळी करुणा जगताप यांचे पती कामासाठी बाहेर गेले होते, तर मुलं शाळेत गेली होती. घरात त्या एकट्याच होत्या. घरात दोन गॅस टाक्या आणि गॅस गिझरही आहे. सोमवारी सकाळी गॅस गळती झाली आणि मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे दिवाळीत घरात शिल्लक असलेले फटाकेही मोठ्या आवाजात वाजू लागले. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, घराचे दार, खिडक्या आणि काचा फुटून त्यांचा मोठा खच थेट खाली रस्त्यावर पडला. याच वेळी दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाच्या अंगावर काचा आणि ग्रीलचे अवशेष पडल्याने तो जखमी झाला. लोणी काळभोर पोलीस या घटनेची नोंद घेऊन तपास करत आहेत.
