Pune Crime : चोरांच्या भीतीनं पिंपात लपवले दागिने; पण घरी आलेल्या मैत्रिणीनंच केलं कांड, पुण्यातील घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चोरीच्या भीतीने आपल्या घरातील सोन्याचे दागिने कपाटाऐवजी एका वेगळ्या ठिकाणी, म्हणजेच पिंपात लपवून ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे.
पुणे : सोनं चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत चांगल्याच वाढल्या आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनेतही प्रचंड वाढ होत आहे. घाबरून लोक घरातील दागिने बँक लॉकरमध्ये ठेवतात. तर, काहीजण घरातच हे दागिने लपवून ठेवतात. पुण्यातून अशा एका महिलेसोबत घडलेली एक घटना समोर आली आहे. यात चोरीच्या भीतीने आपल्या घरातील सोन्याचे दागिने कपाटाऐवजी एका वेगळ्या ठिकाणी, म्हणजेच पिंपात लपवून ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. खडकी परिसरातील इंदिरानगर भागात घडलेल्या या घटनेत पिंपात ठेवलेले एक लाख ९७ हजार रुपये किमतीचे दागिने चक्क एका ओळखीच्याच महिलेने चोरल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगरमधील एका ३७ वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही फिर्यादीच्या घरात नेहमी ये-जा करणारी आणि अत्यंत ओळखीची होती. घरात मौल्यवान वस्तू ठेवल्यास त्या चोरीला जातील या भीतीने फिर्यादीने हे दागिने कपाटात न ठेवता एका पिंपामध्ये सुरक्षित ठेवले होते.
advertisement
या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी महिलेने फिर्यादीचे लक्ष चुकवले आणि पिंपात लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने गुपचूप लंपास केले. चोरी केलेले हे दागिने तिने एका सराफाकडे नेऊन गहाण ठेवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. फिर्यादीने दागिने तपासले असता, ते चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 10:50 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : चोरांच्या भीतीनं पिंपात लपवले दागिने; पण घरी आलेल्या मैत्रिणीनंच केलं कांड, पुण्यातील घटना


