शिवसेनेत फूट पडल्यानंतर संभाजी ब्रिगेडने शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली होती. जवळपास दोन ते अडीच वर्षही युती होती. मात्र, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने ही युती तोडत असल्याची घोषणा केली आहे. विधानसभा जागा वाटपाच्या मुद्यावर ही युती तुटत असल्याचे मनोज साखरे यांनी ही घोषणा केली.
संभाजी ब्रिगेडने काय म्हटले?
advertisement
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासोबत असणारी गेले दोन ते अडीच वर्षाची युती तोडणार असल्याची घोषणा आज पुण्यात संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला योग्य मान मिळाला नसल्याचा आरोप मनोज आखरे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत आम्हाला 5 ते 6 जागा देणार असल्याचे या आधी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते. मात्र आम्हाला आता एकही जागा दिली जात नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे साखरे यांनी सांगितले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे 50 जागा लढणार असल्याची घोषणा मनोज आखरे यांनी केली.
मविआचे जागा वाटप निश्चित नाही...
महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटप जाहीर झाले नाही. बुधवारी, 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत पत्रकार परिषदेत जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची जागा वाटप चर्चा लांबल्याने आघाडीतील इतर लहान घटक पक्षही नाराज आहेत. शेतकरी कामगार पक्षाने आपल्या 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये ठाकरे गट दावा करत असलेल्या सांगोल्याच्या जागेचा समावेश आहे.
