व्याजासह रक्कम 19 कोटींवर
न्यायालयाने मूळ रकमेवर 1 मार्च 2016 (दावा दाखल केल्याची तारीख) पासून वार्षिक 7.5 टक्के व्याज देण्याचेही निर्देश दिले आहेत. व्याजासह ही एकूण रक्कम 19 कोटी 20 लाख 146 रुपये इतकी मोठी झाली आहे.
मृत उद्योजक यांची उत्तराखंड येथे कंपनी होती. 9 जानेवारी 2012 रोजी उद्योजक मोटारीतून मुंबईहून चाकण येथील त्यांच्या कारखान्यात जात होते. दुसऱ्या लेनमधून पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकने उद्योजकाच्या मोटारीला धडक दिली. धडकेमुळे मोटार समोरील लेनमध्ये शिरली. तिथे मागून आलेल्या दुसऱ्या मोटारीने धडक दिली आणि त्याच वेळी पाठीमागून आलेल्या एसटी बसनेही उद्योजकाच्या मोटारीला धडक दिली. या विचित्र अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
Pune News : एका दिवसासाठी घेतली; वर्ष झालं तरी मित्राची आलिशान मर्सिडीज परत करेना तरुण, शेवटी अटक
कुटुंबीयांना मिळाला न्याय
मृत उद्योजकाचे वडील, आई, पत्नी, दोन मुली आणि मुलाने मिळून शिवाजीनगर येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरणात ट्रक मालक आणि खासगी विमा कंपनीविरोधात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता.
अर्जदारांतर्फे ॲड. संजय राऊत, ॲड. अनिता राऊत आणि ॲड. अश्विनी वाडेकर यांनी बाजू मांडली. त्यांनी उद्योजकाचे प्राप्तिकर, अभियांत्रिकी पदवी आणि कंपनीच्या उत्पन्नाची माहिती न्यायालयात सादर केली. तसेच, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या १६ न्यायनिवाड्यांचे दाखले दिले. अॅड. संजय राऊत यांनी हा 'उच्चांकी नुकसान भरपाईचा' निर्णय असून, कुटुंबीयांना न्याय मिळाल्याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे.
