Pune News : एका दिवसासाठी घेतली; वर्ष झालं तरी मित्राची आलिशान मर्सिडीज परत करेना तरुण, शेवटी अटक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अबरार शर्मा याने वारजे येथील गणपती माथा परिसरातून मुंबईला जाण्यासाठी गाडीची गरज असल्याचे सांगितले. गरजवंत समजून शर्मा यांनी आपल्या आलिशान मर्सिडीजची चावी त्याला दिली.
पुणे : केवळ तोंडओळखीवर एका व्यक्तीला आपली गाडी वापरायला देणं, व्यावसायिकाला महागात पडलं. अखेर विश्वासघात करून व्यावसायिकाच्या 70 लाख रुपये किमतीच्या आलिशान मर्सिडीज बेंझ (Mercedes-Benz) गाडीचा वापर करणाऱ्या आरोपीला वारजे पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर अटक केली आहे. आरोपीचं नाव अबरार अख्तर अली सय्यद (वय 25, रा. अहिल्यानगर) असं आहे.
सुमित राजेंद्र शर्मा (व्यावसायिक, वारजे, पुणे) यांची ती मर्सिडीज बेंझ (क्रमांक MH 12 VX 8889) आहे. गेल्या वर्षी ही घटना घडली. आरोपी अबरार सय्यद याची शर्मा यांच्याशी नुकतीच तोंडओळख झाली होती. अबरारने शर्मा यांचा विश्वास संपादन केला. अबरार शर्मा याने वारजे येथील गणपती माथा परिसरातून मुंबईला जाण्यासाठी गाडीची गरज असल्याचे सांगितले. गरजवंत समजून शर्मा यांनी आपल्या आलिशान मर्सिडीजची चावी त्याला दिली.
advertisement
गाडी घेऊन गेल्यानंतर अबरारने ती परत करण्यास अनेक दिवस टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शर्मा यांनी वारजे पोलिसांत तक्रार दाखल केली. हा गुन्हा घडल्यानंतर सुमारे एक वर्ष उलटलं होतं. वारजे पोलीस आरोपी अबरार सय्यदच्या शोधात होते. अखेर, पोलिसांनी त्याला अटक केली.
advertisement
पुणे कोर्टात जामीन, पण मुंबई पोलिसांचा ताबा
बुधवारी (26 नोव्हेंबर 2025) रोजी आरोपी अबरार सय्यदला न्यायालयात हजर करण्यात आलं. पुणे येथील या फसवणुकीच्या प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला, मात्र त्याची सुटका होऊ शकली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कांइगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अबरार सय्यद याच्यावर मुंबईतही फसवणूक आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे जामीन मिळाल्यानंतरही मुंबई पोलिसांनी तात्काळ त्याचा ताबा घेतला आहे.
advertisement
पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, आरोपीने या कालावधीत गाडीचा वापर नेमका कशासाठी केला, याचा तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 27, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : एका दिवसासाठी घेतली; वर्ष झालं तरी मित्राची आलिशान मर्सिडीज परत करेना तरुण, शेवटी अटक


