ईशा केसकरची 'लक्ष्मीच्या पावलांनी' मधून एक्झिट! डोळ्यांना फोड, अन्नातून विषबाधा; म्हणाली, 'त्यावेळी मालिकेच्या टीमने...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Isha Keskar Exit Laxmichya Pavlani : लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकरची एक्झिट होणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर ईशाने समोर येत तिने मालिका सोडली असल्याचं सांगितलं आहे. मालिका सोडण्यामागचं कारणही तिने सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
मटाशी बोलताना ईशाने तिचं मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं. ईशा म्हणाली, "मी सलग दोन वर्ष काम करत होते. जून महिन्यात माझ्या डोळ्याला फोड आला होता पण मी तसचं शूट करत होते. पण दुखापत वाढत असल्याने डॉक्टरांनी मला आराम घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टर असंही म्हणाले की मी विश्रांती घेतली नाही तर भविष्यात छोटी सर्जरी करावी लागेल. त्यानंतर मी 15-20 दिवस सर्यप्रकाशही बघू शकणार नाही."
advertisement
advertisement
मागील काही दिवस ईशा मालिकेतून गायब होती. तेव्हा देखील तिची तब्येत ठीक नसल्याचं तिनं सांगितलं. ती म्हणाली, "मध्यंतरी मला चिकन गुनिया आणि अन्नातून विषबाधा असं दोन्ही झालं होतं. त्यामुळे काही दिवस रजेवर होते. याकाळाक मालिकेच्या टीमनं मला खूप सांभाळून घेतलं. आता डोळ्याच्या दुखापतीमुळे मी पुन्हा त्यांच्याकडे सुट्टी मागणं मला योग्य वाटत नव्हतं. यामुळे मालिकेच्या कथेवरही परिणाम झाला असता त्यामुळे मी मालिकेतून बाहेर पडायचं ठरवलं."
advertisement


