आईची नजर हटली अन् चिमुकला थेट इमारतीच्या गॅलरीतून पडला, नाशकातील धडकी भरवणारा CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकच्या गंगापूर रोडवरील सहदेव नगर भागात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडून एक ३ वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिक शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गंगापूर रोडवरील सहदेव नगर भागात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडून एक ३ वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या सुमित पॅलेस नावाच्या इमारतीत घडली. जखमी झालेल्या लहान मुलाचे नाव श्रीराज अमोल शिंदे (वय ३ वर्ष) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराज हा घरी खेळत असताना अचानक गॅलरीमध्ये गेला.
खेळत असताना तो गॅलरीतील संरक्षणासाठी लावलेल्या ग्रीलवर चढला. परंतु, त्याला स्वतःचा तोल सावरता आला नाही आणि तो थेट पहिल्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळला. श्रीराज खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे चिमुकला श्रीराज गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
उपचारासाठी रुग्णालयात दाखल
घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या श्रीराजला तातडीने नाशिक येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
नाशकात ३ वर्षांचा मुलगा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडला pic.twitter.com/gTZoKCJ3R7
— News18Lokmat (@News18lokmat) November 27, 2025
advertisement
थरारक CCTV फुटेज
हा संपूर्ण अपघात इमारतीच्या परिसरात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेचा थरारक आणि विचलित करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 27, 2025 8:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईची नजर हटली अन् चिमुकला थेट इमारतीच्या गॅलरीतून पडला, नाशकातील धडकी भरवणारा CCTV VIDEO


