लग्न पोस्टपोन, चॅट्सवरून गदारोळ; स्मृतीला यायचं होतं सगळ्यांसमोर, पण स्किप केला मुंबईतील मोठा इव्हेंट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Smriti Mandhana : क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पोस्टपोन झालं. त्यानंतर व्हायरल झालेल्या चॅट्सवरून गदारोळ निर्माण झाला. दरम्यान स्मृतीला सगळ्यांसमोर यायचं होतं पण तिने मुंबईतील मोठा इव्हेंट स्किप केला.
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. 23 नोव्हेंबरला होणारं स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर स्मृतीने डिलीट केलेले फोटो आणि पलाशचे कोरिओग्राफबरोबर लीक झालेले चॅट्स या सगळ्याने या लग्नाला एक वेगळंच वळण दिलं. दरम्यान याचा परिणाम कुठेतरी स्मृतीच्या करिअर होताना दिसतोय.
स्मृती मानधनच्या तिच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे लग्नानंतर 'केबीसी 17 ' मध्ये सहभागी होणार होती. पण घडलेल्या संपूर्ण प्रकारानंतर स्मृती 'केबीसी 17' चं शूटींग रद्द केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या शोच्या वर्ल्ड कप स्पेशल एपिसोडमध्ये स्मृती भारतीय महिला क्रिकेट संघासोबत येणार होती. पलाश मुच्छलशी लग्न पुढे ढकलल्यामुळे आता ती 'केबीसी 17' मध्ये तिच्या सहकारी क्रिकेटपटूंसोबत सहभागी झाली नाही. हरमनप्रीत कौर, रिचा घोष आणि शफाली वर्मा यांच्यासह अनेक भारतीय महिला क्रिकेटपटू 'केबीसी 17' च्या स्पेशल एपिसोडमध्ये सहभागी होऊन गेम खेळणार आहेत.
advertisement
( तिच स्टाइल तिच पोझ, फक्त गर्लफ्रेंड बदलली, स्मृतीआधी पलाशने 'ती'लाही केलेलं सेम प्रपोज, Photo Viral )
'केबीसी 17' च्या या एपिसोडमध्ये स्मृती मानधना दिसणार नाही ही गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले, कारण स्मृती खूप लोकप्रिय आहे आणि भारतीय संघाच्या यशात तिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्मृती मानधना केबीसीवर दिसणार नाही या बातमीवर तिच्या चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या.
advertisement
स्मृती जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे, म्हणून तिच्या चाहत्यांना तिला केबीसीवर पाहण्याची अपेक्षा होती. परंतु या बातमीने चाहत्यांची देखील निराश केले. दरम्यान चाहत्यांनी स्मृतीलाही मोठा पाठिंबा दिला आहे. तसंच तिच्या वडिलांना लवकर बरे वाटावं आणि त्यांचं मानसिक आरोग्या व्यवस्थित रहावं यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्मृती मानधनाचं 23 नोव्हेंबर 2025 रोजी संगीतकार पलाश मुच्छलबरोबर लग्न होणार होतं. लग्नाच्या काही तास आधी तिचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या हार्ट अटॅक आल्याचं सांगण्यात आलं. तिच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्मृती सध्या तिच्या वडिलांची काळजी घेत असल्यामुळे केबीसीच्या शूटींगमध्ये सहभागी झाली नाही.
advertisement
स्मृतीच्या आयुष्यात घडलेल्या या अनपेक्षित घटनेनंतर एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे लग्न पुढे ढकललं आहे ही घोषणा केल्यानंतर स्मृती मानधनाने साखरपुड्याचा व्हिडिओ डिलीट केला. त्याचबरोबर लग्नाआधीच्या सगळ्या विधींचे फोटो देखील डिलीट केले. यामुळे तिच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर भलत्याच चर्चा सुरू झाल्या.
यानंतर पुढील काही तासात एका कोरिओग्राफरने पलाशबरोबरचे काही चॅट्स सोशल मीडियावर लीक केले. हे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्क्रिनशॉटमध्ये पलाश कोरिओग्राफरबरोबर फ्लर्ट करत असल्याचं दिसतंय. पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला का? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. याबाबत स्मृती किंवा पलाश यांच्यापैकी कोणीही भाष्य केलेलं नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 8:06 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
लग्न पोस्टपोन, चॅट्सवरून गदारोळ; स्मृतीला यायचं होतं सगळ्यांसमोर, पण स्किप केला मुंबईतील मोठा इव्हेंट


