नाकातून रक्तस्त्राव, 5 गंभीर आजारांशी झुंज, अखेर अभिनेत्रीने केली कमाल, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही झालेले थक्क
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने 5 गंभीर आजाराशी यशस्वी झुंज दिली आहे. अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं होतं.
advertisement
'बिग बॉस 13' हा सीझन खूप गाजला. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला व्यतिरिक्त पारस छाबडा, आसिम रियाज आणि माहिरा शर्मा यांचीही खूप चर्चा झाली. या सीझनमध्ये एक वाइल्ड कार्ड एंट्रीही झाली होती. शोमध्ये येताच या स्पर्धकाने धुमाकूळ घातला होता. ती घरात येताच शहनाज गिलशी भिडली होती. दोघांच्या भांडणात शहनाज गिलला अश्रू अनावर झाले होते. नंतर तिच्यावरच आसिम रियाज फिदा झाला आणि घरातच त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
advertisement
advertisement
advertisement
हिमांशी खुराना तीन वर्षांपासून स्वत:वर काम करत होती. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती प्रयत्नशील होती. त्यामुळेच गंभीर समस्यांशी झुंज देत तिला फिट होता आलं. तिचा हा प्रवास रातोरात झालेला नव्हाता. तिच्या या प्रवासात तिची डॉक्टर मैत्रीण कधीच कंटाळली नाही. उलट हिमांशीला तिचं ध्येय गाठण्यात पाठिंबा देत राहिली.
advertisement
हिमांशी खुरानाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आज अभिनेत्री आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तिच्या फोटोवर चाहत्यांच्या नेहमीच सकारात्मक कमेंट पाहायला मिळतात. तू आधीही सुंदर होतीस, आता तर आणखी दिसतेस, तू जे केलं आहेस ते सोपं नाही, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, अशा कमेंट्स हिंमाशी खुरानाच्या फोटोंवर चाहते करतात.


