PM Kisan च्या लाभार्थी यादीतून तुमचं नाव कट झालंय का? पुन्हा कसं अॅड करायचे?

Last Updated:

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून तुमचे नाव वगळले गेले आहे का? अलीकडेच या योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.

pm kisan yojana
pm kisan yojana
मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून तुमचे नाव वगळले गेले आहे का? अलीकडेच या योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये पाठवले. याआधी पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-कश्मीर या राज्यांतील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला होता. मात्र, यावेळी दिलेल्या आकडेवारीनुसार 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
31 लाख संशयास्पद लाभार्थी सापडले
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अलीकडील तपासणीत 31 लाखांहून अधिक लाभार्थी संशयास्पद असल्याचे लक्षात आले. काही लोक पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने कठोर पावले उचलली असून अशा लाभार्थ्यांचा 21 वा हप्ता रोखण्यात आला आहे.
किती शेतकऱ्यांची नावे यादीतून काढली?
2 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या 20 व्या हप्त्यात 9 कोटी 71 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पैसा देण्यात आला होता. पण 21 व्या हप्त्यात फक्त 9 कोटी 35 लाख 53 हजार 157 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले गेले. म्हणजेच 35 लाख 88 हजार 245 शेतकरी यादीतून वगळले गेले.
advertisement
फक्त उत्तर प्रदेशातीलच जवळपास 19 लाख शेतकऱ्यांची नावे काढण्यात आली आहेत. ओडिशामध्ये मागील वेळी 34 लाख 84 हजार शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते, तर यावेळी ही संख्या कमी होऊन 34 लाख 12 हजारांवर आली आहे. इतर अनेक राज्यांमध्येही लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.
नाव का काढून टाकण्यात आले?
एका कुटुंबातील पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत होते.कुटुंबातील एखादा अल्पवयीन सदस्यही पैसे मिळवत होता.PM किसान योजनेचे eKYC पूर्ण झाले नव्हते. ज्या शेतकरी आयडी तयार केले नव्हते. अशा लोकांचे नाव काढून टाकण्यात आले आहेत.
advertisement
कोणती प्रक्रिया करावी लागणार?
eKYC पूर्ण करा - जर तुमचे eKYC अजून झाले नसेल, तर तात्काळ PM किसान पोर्टलवर जाऊन ते पूर्ण करा.
शेतकरी आयडी मिळवा - शेतकरी आयडी घरबसल्या ऑनलाइन मिळवता येतो. तो तयार नसेल तर लगेच तयार करा.
कुटुंबातील डुप्लिकेट नावे हटवा - जर पती-पत्नी किंवा अल्पवयीन मूल लाभ घेत असेल, तर पोर्टलवर “Surrender” पर्याय वापरून एका सदस्याचा लाभ परत करा.
advertisement
कृषी विभागाकडे पडताळणी - सर्व काही योग्य असूनही तुमचे नाव काढले गेले असे वाटत असल्यास जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवा.
नाव पुन्हा जोडता येईल का?
याचं उत्तर 'होय' असं आहे. जर तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असाल, तर PM किसान योजनेत तुमचे नाव पुन्हा समाविष्ट केले जाऊ शकते. इतकेच नव्हे, तर मागील हप्त्याचे प्रलंबित पैसेही मिळू शकतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
PM Kisan च्या लाभार्थी यादीतून तुमचं नाव कट झालंय का? पुन्हा कसं अॅड करायचे?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement