ShaniDev: मिथुन, कर्कसहित 4 राशीवाल्यांना वाईट दिवस; शनिचा बदललेला मार्ग नवी संकटे आणेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: 29 मार्च 2025 नंतर आता 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनिच्या स्थितीत पुन्हा बदल होत आहे. मीन राशीत असलेला शनी आता सरळ मार्गी होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रह जेव्हाही आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा परिणाम मेष ते मीन पर्यंतच्या सर्व 12 राशींवर होतो, शनिची सरळ मार्गी स्थिती महत्त्वाची मानली जाते. या स्थितीचा 2026 पर्यंत प्रभाव राहील. शनिच्या सरळ मार्गी गतीचा चार राशींवर विशेष परिणाम होईल. या राशींना विविध अडचणी येऊ शकतात, नीट सुरू असलेल्या गोष्टीही विस्कळीत होऊ शकतात.
मिथुन - शनीच्या सरळ मार्गी होण्याचा मिथुन राशीला त्रास होईल. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात कोणतेही आर्थिक व्यवहार टाळावेत, कारण यामुळे समस्या उद्भवू शकतात. गुंतवणूक करायची असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या. शनीच्या स्थितीमुळे मिथुन राशीच्या खर्चात वाढ होण्याचे संकेत आहेत. तुमचे आर्थिक व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक - शनिच्या स्थितीचा वृश्चिक राशीच्या लोकांवर परिणाम दिसेल. पालकांशी किंवा शिक्षकांशी वाद होऊ शकतात. या काळात तुमच्या वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. सभोवतालच्या लोकांपासून सावध राहावे, फार आवश्यक असल्यासच इतरांचा सल्ला घ्यावा. या राशीच्या नोकरदार व्यक्तींनी कामावर लक्ष केंद्रित करावे, वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे, कारण यामुळे समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबा.
advertisement
advertisement


