'पुणे ग्रँड चॅलेंज'साठी तयार केलेला रस्ता 24 तासांत निकामी; महापालिकेचा खर्च 'पाण्यात'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
स्वारगेटजवळील मित्रमंडळ चौकात नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याखालून जाणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्त्याचे झालेले काम आणि महापालिकेचा खर्च पाण्यात गेला आहे.
पुणे : पुणे शहरात जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी (पुणे ग्रँड चॅलेंज) तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या काही तासांतच खराब झाला आहे. स्वारगेटजवळील मित्रमंडळ चौकात नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याखालून जाणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्त्याचे झालेले काम आणि महापालिकेचा खर्च पाण्यात गेला आहे.
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा ७५ किलोमीटरचा मार्ग पुणे शहरातून जात आहे. या मार्गाला आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्याचे काम महापालिकेच्या पथ विभागाने हाती घेतले आहे. याच कामांतर्गत, स्पर्धेचा मार्ग असलेल्या मित्रमंडळ चौकात दोन दिवसांपूर्वी रस्ते डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते.
advertisement
डांबरीकरणानंतर जलवाहिनी फुटली
डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच रस्त्याच्या खालून जाणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यातून हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाहून गेलं. नव्याने तयार झालेला रस्ता पाण्यामुळे खराब झाला. यासोबतच चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही निर्माण झाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही दुचाकीस्वार घसरण्याचे प्रकारही घडले.
दुरुस्तीसाठी पुन्हा खोदकाम
जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हा रस्ता पुन्हा खोदला आहे.
advertisement
पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं, ते म्हणाले की "रस्त्याचे डांबरीकरण करताना वापरलेल्या रोलरच्या दाबामुळेच मुख्य जलवाहिनी फुटली असावी. फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरू आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर हा रस्ता पूर्ववत करून वाहतूक सुरळीत केली जाईल आणि पाणीपुरवठाही लवकरच सुरळीत होईल."
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 27, 2025 9:10 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'पुणे ग्रँड चॅलेंज'साठी तयार केलेला रस्ता 24 तासांत निकामी; महापालिकेचा खर्च 'पाण्यात'


