TRENDING:

St News : फक्त 60 दिवसांच्या भाड्यात तब्बल 90 दिवस प्रवासाची संधी; एसटीची प्रवाशांसाठी आकर्षक ई- पास योजना जाहीर

Last Updated:

ST Mahamandal Pass Yojana : एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नवी ई-बस पास योजना जाहीर केली आहे. यामध्ये प्रवाशांना फक्त 60 दिवसांचे भाडे भरून तब्बल 90 दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.ही योजना नेमकी कोणासाठी लागू असेल या विषयी सविस्तर जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या ई-बस सेवेला अधिक चांगला प्रतिसाद मिळवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता ई-बस प्रवाशांना मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध करून दिली जाणार आहे. या निर्णयामुळे दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
News18
News18
advertisement

कोणत्या बसेससाठी लागू होणार ई-बस पास?

ई-बससाठी घेतलेला महाग पास असलेले प्रवासी आता साध्या किंवा निमआराम एसटी बसमध्येही प्रवास करू शकतील. ज्यांच्याकडे निमआराम किंवा साध्या बसचा पास आहे, ते प्रवासी ई-बसने प्रवास करू इच्छित असतील, तर त्यांना दोन्ही सेवांमधील भाड्यातील फरक 100 टक्के दराने भरून प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचा अधिक लवचिक आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.

advertisement

एसटीच्या या नव्या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दररोज नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे. सध्या राज्यात ई-बस प्रकल्पांतर्गत 448 बसेस कार्यरत आहेत तर शिवाई प्रकल्पांतर्गत आणखी 50 ई-बसेस रस्त्यावर धावत आहेत. पुढील काळात ही संख्या अधिक वाढविण्याचा महामंडळाचा मानस आहे.

advertisement

पुणे विभागात सध्या 50 ई-शिवाई बसेस सेवेत आहेत. या बसेस प्रामुख्याने सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि बारामती या मार्गांवर प्रवास करतात. प्रवाशांच्या प्रतिसादावरून ही सेवा हळूहळू विस्तारली जात आहे. विशेष म्हणजे ई-बस सेवेत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सध्या 50 टक्के सवलतीचा लाभ मिळत आहे. त्यामुळे या सेवेला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

advertisement

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की,ई-बस प्रकल्पामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीत नवा बदल घडत आहे. पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळत आहे. पास सवलत योजनेमुळे ई-बस सेवेकडे प्रवाशांचा ओढा अधिक वाढेल आणि एसटी महामंडळाची आर्थिक स्थितीही सुधारेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
खिचिया पापड मुंबईत खावा तर इथंच, 40 रुपयांत मन होईल तृप्त, VIdeo
सर्व पहा

राज्यातील ई-बस सेवा सध्या पर्यावरणपूरक, कमी आवाजातील आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचा उत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे. या योजनेमुळे प्रवाशांचा खर्च कमी होईल तसेच दररोजच्या प्रवासात वेळ आणि श्रम वाचतील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा हा निर्णय प्रवाशांच्या हिताचा आणि हरित वाहतुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
St News : फक्त 60 दिवसांच्या भाड्यात तब्बल 90 दिवस प्रवासाची संधी; एसटीची प्रवाशांसाठी आकर्षक ई- पास योजना जाहीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल