मुंबई : जानेवारी महिन्यात राज्यातील हवामानात अनेक बदल घडून आलेत. कधी थंडीचा जोर, ढगाळ वातावरण तर कधी पाऊस अशा अनेक विचित्र परिस्थिती बघायला मिळाल्या. जानेवारीच्या शेवटी सर्वत्र कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली. आता फेब्रुवारी महिन्यात देखील राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. 4 फेब्रुवारीला राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात 4 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत मुंबईतील किमान तापमानात 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
तुरीच्या दरात मोठी घसरण, हमीभावापेक्षा कमी मिळतोय भाव, शेतकरी हवालदिल
पुण्यामध्ये 4 फेब्रुवारीला धुके आणि अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामधील तापमानात वाढ झाल्याने तेथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
4 फेब्रुवारीला नाशिकमध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील कमाल आणि किमान तापमानात फारशी वाढ झाली नसल्याने तेथील नागरिकांना सकाळच्या वेळी काहीशी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये 4 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमधील कमाल आणि किमान या दोन्ही तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीस राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. नागपूरमधील कमाल आणि किमान या दोन्ही तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर पुण्यातील कमाल तापमानात देखील इतर शहरांच्या तुलनेत जास्त वाढ झालेली दिसून येत आहे. उन्हाचा कडाका वाढत असल्याने आता गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.