कृष्णा देविदास एकंडे असं अटक केलेल्या २५ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो धाराशिव जिल्ह्यातील ध्रुता गावातील रहिवाशी आहे. पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी कृष्णा एकंडे हे एकमेकांना ओळखतात. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने तरुणीला गोड बोलला. तिला लग्नाचे वचन दिले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. काही काळानंतर, पीडितेने जेव्हा आरोपीकडे लग्नाबद्दल विचारणा केली, तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्याने तिला धमकावलंही.
advertisement
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कृष्णा एकंडे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.