TRENDING:

Pune News: मंडईच्या मेट्रो स्टेशनचे नावं बदललं, ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा

Last Updated:

Mandai Metro Station Name Rename: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंडई मेट्रो स्टेशनचे नामकरण करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंडई मेट्रो स्टेशनचे नामकरण करण्यात आले आहे. मंडई मेट्रो स्टेशनचे नामकरण 'महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन' असे करण्यात आले आहे. मेट्रो स्टेशनच्या नावात बदल केल्यामुळे आज पुण्यात (20 डिसेंबर) माळी महासंघातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत, फटाके वाजवून आणि पेढे वाटून हा जल्लोष महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन, गोटीराम भैय्या चौक येथे करण्यात आला.
Pune News: मंडईच्या मेट्रो स्टेशनचे नावं बदललं, ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा
Pune News: मंडईच्या मेट्रो स्टेशनचे नावं बदललं, ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा
advertisement

मेट्रो स्थानकाचे नामकरण करताना, माजी आमदार कमल ढोले- पाटील, माळी महासंघ पुणे शहरचे अध्यक्ष दीपक जगताप, प्रदेश महिला अध्यक्ष गायत्री लडकत, पुणे शहर अध्यक्ष स्मिता लडकत सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार कमल ढोले-पाटील म्हणाल्या की, "महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली आणि समाजाच्या उत्थानासाठी आपले जीवन समर्पित केले. अशा महात्म्याचे नाव मंडई मेट्रो स्टेशनला देण्याऐवजी केवळ 'मंडई मेट्रो स्टेशन' असे नामकरण खोडसाळपणे करण्यात आले होते."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

"माळी महासंघासह इतर संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेला राज्यातील नेतृत्वाने वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि योग्य तो नामविस्तार घडवून आणला, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत." असे ढोले-पाटील शेवची म्हणाल्या. पुण्यामध्ये कायमच ट्रॅफिकचा मुद्दा चर्चेत असतो. मेट्रो सुरू झाल्यामुळे पुणेकरांना काहीशा प्रमाणात तरी ट्रॅफिकच्या कटकटीतून थोड्याफार प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: मंडईच्या मेट्रो स्टेशनचे नावं बदललं, ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल