अंबाबाईच्या प्रसादाची होणार तपासणी! देवस्थान समितीने सांगितलं कारण
म्हाडाच्या पुणे विभागाकडून साडेचार हजार घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या मंडळांतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सातारा, सोलापूर तसेच कोल्हापुरमध्ये घरांची लॉटरी निघाली आहे. जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रात 1538, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 1534 आणि पुणे महानगर प्रदेशविकास प्राधिकरणमध्ये 1114 असे एकूण 4186 सदनिका आहे. तर म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असं 1683 सदनिका तर म्हाडा पीएमएवाय योजनेतील सदनिका 299 असे एकूण 6168 सदनिकांसाठी सोडत निघाली आहे.
advertisement
पुणेकरांनो देवीच्या दर्शनाला निघालात? बाहेर पडण्याआधी पाहून घ्या वाहतुकीतील बदल
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांत घरकुलांसाठी तीन सोडती काढल्या गेल्या होत्या. याचा फायदा सर्वसामान्यांना नक्कीच होईल. पिंपरी चिंचवड शहराचा वेगानं विकास होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील भागांमध्ये घरांची सोडत निघाली आहे. पिंपरी चिंचवड शहराजवळील चाकण आणि नेरे परिसरात म्हाडाच्या नवीन प्रकल्प राबविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 'म्हाडा'ने काढलेल्या घरांची सोडत 11 सप्टेंबरला करण्यात आली. 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांना 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम https://housing.mhada.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
घटस्थापनेसाठी लागणाऱ्या बांबूच्या टोपल्यांची मागणी घटली, काय आहे कारण?
सोडतीसाठी अर्जाची प्रारूप यादी 11 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जर अर्जदारांना दावे किंवा हरकती दाखल करायचे असेल, ते ही ते करू शकात. त्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर आहे. सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर संपूर्ण घरांची सोडत 21 नोव्हेंबरला केली जाणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पुणे म्हाडा मंडळाकडून सोडत जाहीर केली. या घरांची किंमती 20 लाखांपासून सुरू होत आहे. 20 लाखांपासून ते 40 लाखांपर्यंत घरांच्या किंमती असणार आहेत.