राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.याला कारण ठरलाय फरार गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना दिला.पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायतवळचा भाऊ सचिन घायवळला पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता. पण गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचा अहवाल डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला होता. न्यूज १८ लोकमतनं हे वृत्त दिल्यानंतर राजकारण ढवळून निघालंय. विरोधकांनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
advertisement
योगेश कदम काय म्हणाले?
विरोधकांनी कोंडी केल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या बचावासाठी त्यांचे वडील आणि शिवसेना नेते रामदास कदम पुढे सरसावले आहेत. योगेश कदमांना टार्गेट केलं जातंय, असं रामदास कदम म्हणाले.शिवसेनेच्या मंत्र्यांनीही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय. तर पोलीस अहवालानुसार सुनावणीच्या दिवशी सचिन घायवळविरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते आणि न्यायालयीन निर्णयाने तो निर्दोष मुक्त झाला होता. त्यामुळे नियमानुसार कार्यवाही करण्यात आली, असा दावा योगेश कदमांनी केला आहे.
योगेश कदमांची चांगलीच कोंडी
गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना का दिला? याचं उत्तर एकीकडं विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय तर दुसरीकडं योगेश कदमांची बाजू सावरताना शिवसेना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय.
योगेश कदम अडचणीत अडकण्याची ही काही पहिलीचं वेळ नाही.स्वागरगेट बलात्कार प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य, सावली बारवरील पोलिसांचा छापा, दापोलीतील अवैध वाळू उपशाचे आरोप विरोधकांनी केले होते.या प्रकरणावरून योगेश कदमांना विरोधकांनी टार्गेट केलं होतं. आता सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी योगेश कदमांची चांगलीच कोंडी झाली आहे.