दुसरीकडे वाहातूक सुरळीत करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. बोरघाटात 10 किलोमीटर दूरपर्यंत वाहनांच्या रांग लागल्याचं पाहायला मिळालं. याचदरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवे सह जुन्या मार्गांवर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने अचानक बंद पडल्याची घटना समोर आली होती. मुंबई-पुणे मार्गावर पुण्याकडे जाताना शिंग्रोबाच्या अगोदरपासून मोठ्या प्रमाणात वाहने बंद पडले. वाहनं अचानक बंद पडल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. महिला आपल्या लहान मुलांसह टोविंग व्हॅन व मेकॅनिकच्या प्रतिक्षेत रस्त्यावर बसल्याचं चित्र होतं. तर चालक आपल्या गाड्यांचं बोनट ओपन करून वाहनाला धक्का मारताना दिसते.
advertisement
आता त्याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. महामार्गवर शेकडो वाहने बंद पडली आहेत, आणि त्या वाहनाचं बोनट चालकांनी ओपन केलं आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे आतील यंत्रणा ओव्हर हिटिंग होत असल्यानं तिला थंड करण्यासाठी चालकांनी बोनट ओपन केलं होतं.