कामाच्या वेळेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असेल. हलक्या व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक किमी 55 वरून वळवण्यात येईल. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग 46 वरून वाहने नेता येतील.
पुण्याकडून मुंबईला येणारी सर्व वाहने पनवेल एक्झिटवरून वळवण्यात येऊन ती एनएच 48 वरून करंजाडे मार्गे कळंबोली आणि एनएच48 वरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने पुढे जातील. मुंबईकडे येणारी वाहतूक वळवण्यात येणार असून हलकी वाहने आणि बसेस मुंबई मार्गिकेवर किमी 39.800 खोपोली एक्झिटवरून
advertisement
एनएच48 वर येतील. तर पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व वाहने खालापूर एक्झिटवरून एनएच 48 वर आणि खोपोली शहरातून शेडुंग टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने नेता येतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 17, 2024 8:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway Update : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तास बंद राहणार वाहतूक