पुण्याच्या नवले पुलावर दोन कंटेनर आणि कारची धडक होऊन विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या तीनही गाड्या एकाच दिशेने भरधाव वेगाने धावत होत्या. याच दरम्यान एका कंटेनर चालकाच्या गाडीचा ब्रेक झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या कारची आणि कंटेनरची धडक बसली. या धडकेनंतर दोन्ही कंटेनरने अचानक पेट घेतला होता.त्यामुळे कंटेनरचालक बाहेर पडले होते. पण दोन्ही कंटेनरच्यामध्ये एक कार अडकली होती.या कारमधून काही जण प्रवास करत होते.या कारमधील प्रवाशांना लगेच बाहेर पडता आले नाही.त्यामुळे या अपघातात आता काही लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
धक्कादायक म्हणजे ज्यावेळेस हा अपघात घडला आणि दोन्ही कंटेनरला आग लागली होती.त्यावेळेस इंतर गाड्या अपघाताच्या नजीकच प्रवास करत होत्या. पण पोलिसांच्या या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वाहतूक थांबवली होती.तसेच अग्निशामन दलाला देखीस पाचारण करण्यात आले आहे. अग्निशामन दलाचा 2 वाहनांनी आगिवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतून






