कर्मचारी कपातीवर सदस्यांकडून प्रश्न
विधान परिषदेतील सदस्यांनी, 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रमाणे राज्यातील इतर आघाडीच्या कंपन्यांनीसुद्धा कर्मचारी कपात केल्यास अनेक कुटुंबांचा रोजगार जाईल का?' असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने आकडेवारी सादर केली. सरकारने स्पष्ट केले की, राज्यात पुणे शहरातील सुमारे ४५ हजार कर्मचाऱ्यांपैकी ३७६ कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून कमी केले आहे. मात्र, ही कपात एआयमुळे केलेली नाही, असे संबंधित कंपनीने सरकारला कळवले आहे.
advertisement
कर्मचाऱ्यांसाठी दिलासा
मंत्री ॲड. फुंडकर यांनी दिलेले हे स्पष्टीकरण राज्यातील आयटी (IT) आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. एआयमुळे नोकऱ्यांवर संकट येईल, अशी भीती व्यक्त होत असताना, सरकारने विधान परिषदेत ही वस्तुस्थिती समोर आणली आहे. सध्या तरी महाराष्ट्रातील कर्मचारी कपातीचा थेट संबंध एआय तंत्रज्ञानाशी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
AI वर फक्त खापर न फोडता स्कील्स वापरणे आणि AI चा वापर करून अपडेट होणं गरजेचं आहे. नाहीतर AI ऐवजी स्कील्सची कमतरता असल्याने नोकरी किंवा खुर्ची धोक्यात येऊ शकते हे मात्र नक्की. आपले स्कील्स वापरून AI च्या मदतीनं उलट वेगानं काम पूर्ण करता येऊ शकतं. कामाची गुणवत्ता अधिक सुधारण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. AI मुळे नोकऱ्या गेल्या नाहीत हे विधिमंडळात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं.
