विविध गोष्टीच्या खरेदीसाठी पुण्यातील रविवार पेठ मार्केट प्रसिद्ध आहे. सध्या या ठिकाणी ग्राहकांसाठी 8 हजारांहून अधिक प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये पारंपरिक डिझाईनपासून ते आधुनिक कल्पनांवर आधारित राख्यांचा समावेश आहे. यामध्ये QR कोड राखी, कपल राखी, गुगल राखी, ग्रीटिंग कार्ड राखी, कार्टून राखी, डायमंड राखी, लुंबा राखी, चांदीची राखी अशा अनेक प्रकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही राख्यांमध्ये गाणी वाजत आहेत तर काही राख्यांमध्ये लाईटिंग इफेक्ट्सही दिसत आहे.
advertisement
Rakshabandhan 2025:अंधारातून शोधला आयुष्याचा प्रकाश, मुलांच्या इच्छाशक्तीला सलाम
या बाजारपेठेतील प्रसिद्ध विक्रेते राम किशोर मुंदडा यांनी सांगितले की, ते गेल्या 50 वर्षांपासून राखी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यावर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या सात ते आठ हजार राख्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. दोरी राखी, डिझायनर लुंबा राखी, कपल राखी, डायमंड व चांदीच्या राख्यांना यावर्षी विशेष मागणी आहे.
मुंदडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी इव्हील आय राख्यांना देखील चांगली मागणी आहे. लहान मुलांसाठी देखील राख्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी असलेल्या घड्याळ राखीमध्ये लाईट आणि म्युझिकची सुविधा आहे. तसेच, ऑपरेशन सिंदूर, स्पायडरमॅन, छोटा भीम, शिवा इत्यादी कार्टून कॅरेक्टरवर आधारित राख्याही उपलब्ध आहेत. मिलिट्री राखी ही एक अनोखी संकल्पना देखील ग्राहकांना आकर्षित करत आहे.
या सर्व प्रकारांतील राख्यांची किंमत फक्त 1 रुपयांपासून सुरू होते. मार्केटमध्ये 250 रुपयांपर्यंत किंमत असलेल्या राख्या देखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमीतकमी किंवा जास्तीत जास्त बजेट असलेल्या प्रत्येक ग्राहकाला येथे योग्य राखी निवडण्याची संधी मिळत आहे. या बाजारात राख्यांसोबतच ग्रीटिंग कार्ड्स, रोली-चंदन, डिझायनर पूजेच्या थाळ्या आणि गिफ्ट पॅकेजेस देखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. विक्रेत्यांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.