याप्रकरणी उमाकांत रामदास ढाके, एक संशयित महिला आणि शुभम उमाकांत ढाके (सर्व रा. पिंपरी) या तिघांविरोधात संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजुद्दीन कमला शेख (वय ४४, रा. घरकुल, चिखली) यांनी शनिवारी यासंदर्भात फिर्याद दिली.
Pune News: मॅट्रिमोनिअल साइटवर शोधला नवरदेव; पुण्याच्या तरुणीसोबत घडला भयंकर प्रकार, पोलिसांत धाव
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २९ जुलै २०२४ ते २९ नोव्हेंबर २०२५ या सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत फिर्यादीसह इतर आठ नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांनी स्वस्त दरात घरे मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन या नऊ जणांकडून वेळोवेळी विविध कागदपत्रांच्या आणि प्रक्रियेच्या नावाखाली २० लाख रुपये उकळले. मात्र, ठरल्याप्रमाणे घरे न देता, आरोपींनी नागरिकांशी संपर्क साधणे टाळण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींची टोळी आणखी किती जणांना फसविण्यात यशस्वी झाली, याचा शोध घेत आहेत. मात्र, नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवून पैसे गुंतवण्याआधी पूर्ण माहिती घ्यावी, असं आवाहनही करण्यात येत आहे.
