या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या विविध कामांना तातडीने गती देण्याची सूचना करण्यात आली. या निर्णयानुसार, येत्या पाच डिसेंबरपूर्वी हिंजवडीतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, हिंजवडीतील नवीन प्रस्तावित रस्त्यांच्या कामांना गती देणे, कायमस्वरूपी सिग्नल बसवण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करणे आणि धोकादायक डंपर चालकांवर कडक कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे.
advertisement
हिंजवडी-पिरंगुट रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी फेज-१ ते फेज-३ दरम्यान उन्नत मार्गाचा (Elevated Road) प्रस्ताव तयार करण्याचे आणि त्यासाठी एमआयडीसीकडून भूसंपादन करण्याचे निर्देश डॉ. म्हसे यांनी दिले. तसेच, पुणे-मुंबई महामार्गावर भुयारी मार्ग (Underpass) विकसित करण्याचे नियोजन आहे.
वाघोली आणि शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांच्या कामाला गती देण्यात येत आहे. खराडी जकात नाका ते केसनंद या नियोजित रस्त्याचे सीमांकन पूर्ण झाले असून, भूगाव बाह्यवळण रस्त्याचे (८५० मीटर लांब) काम लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय, सुरभी हॉटेल ते भावडी, लोहगाव आणि तुळापूर-भावडी वाघेश्वर मंदिर रस्त्यांच्या भूसंपादनाचे कामही तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
