ई-यंत्रणा प्रकल्प
या प्रकल्पांतर्गत सोसायटी, शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमध्ये कचरा आणि प्लास्टिक संकलन मोहिमा राबविल्या जातात. पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे महाअभियाने आयोजित केली जातात. साप्ताहिक संकलन केंद्रांमधून गोळा झालेल्या ई-कचऱ्याचे वर्गीकरण करून वापरण्यायोग्य लॅपटॉप आणि संगणक गरजू शाळा, संस्था आणि विद्यार्थ्यांना दिले जातात. उर्वरित ई-कचरा आणि प्लॅस्टिक कचरा अधिकृत रीसायकलिंग केंद्राकडे पाठवून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. तसेच, ई-कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू बनवण्याच्या आंतरशालेय स्पर्धाही घेतल्या जातात.
advertisement
Success Story: शिक्षण नववी, बँक बॅलन्स मात्र लाखांत! कामगाराने शोधला सक्सेस मंत्रा
परिपूर्ण प्रकल्पाअंतर्गत महिलांच्या हाताला रोजगार
या उपक्रमांतर्गत जुन्या कपड्यांचे संकलन करून वापरण्यायोग्य नवीन कपडे तयार केले जातात आणि ते गरजूंपर्यंत पोहोचवले जातात. उर्वरित कपड्यांपासून विविध वस्तू तयार करून महिलांना रोजगार दिला जातो. कोंढवा, हडपसर, गोखलेनगर आणि वडगाव बुद्रुक येथे प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.
ग्रीन कन्सल्टन्सी
या प्रकल्पांतर्गत सोसायटी आणि व्यावसायिक स्तरावर कॉम्पोस्ट खत, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बायोगॅस प्रकल्पांची उभारणी केली जाते. प्रकल्पानंतर आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. घरगुती वापरासाठी उपयुक्त कॉम्पोस्ट कीट संस्थेद्वारे तयार करण्यात आले असून, घरच्या घरी खत तयार करण्याचे प्रशिक्षण विविध स्तरांवर दिले जाते. पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या या उपक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धनासाठी मदत होत आहे.





